व्यापाऱ्याच्या घरातून 7 लाखांचा मुद्देमाल चोरीला; पण त्यात सोनं, चांदी नव्हे; जे चोरलं ते ऐकून पोलिसांनीही डोक्याला लावला हात

आतापर्यंत आपण चोरीच्या अनेक घटना ऐकल्या असतील मात्र तुम्ही केसांनी चोरी झाल्याची घटना ऐकलीय का? नाही ना. मात्र हरियाणातील फरिदाबादमध्ये केसांची चोरीची घटना घडली आहे.   

शिवराज यादव | Updated: Jan 21, 2025, 09:07 PM IST
व्यापाऱ्याच्या घरातून 7 लाखांचा मुद्देमाल चोरीला; पण त्यात सोनं, चांदी नव्हे; जे चोरलं ते ऐकून पोलिसांनीही डोक्याला लावला हात title=

आजवर वेगवेगळ्या वस्तूंच्या चोरीचे प्रकार तुम्ही ऐकले असतील.. सोनं, चांदी, गाडी.. पण कधी केस चोरांबद्दल ऐकलंय का? तीही थोडीथोडकी नव्हे तर ७ लाखांचे केस चोरी झाले आहेत. 

अबब ! 7 लाखांचे केस चोरीला

चोरांनी मारला केसांवर डल्ला

व्यापा-याच्या घरातील पोतंभर केस चोरीला

आतापर्यंत आपण चोरीच्या अनेक घटना ऐकल्या असतील मात्र तुम्ही केसांनी चोरी झाल्याची घटना ऐकलीय का? नाही ना. मात्र हरियाणातील फरिदाबादमध्ये केसांची चोरीची घटना घडली आहे. 

होय तुम्ही ऐकताय ते खरंय चक्क केसांची चोरी झाली आहे आणि तीदेखील 7 लाख रुपयांच्या केसांची, त्याचं झालं असं की एका केसांच्या व्यावसायिकाच्या घरात केसांनी भरलेलं एक पोतं होतं. या व्यापाऱ्याच्या घरातील केसांनी भरलेल्या पोत्यावरच चोरट्यांनी डल्ला मारला आहे. केसांच्या चोरीची ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. रणजीत मंडल असं या व्यापाऱ्याचं नाव आहे.

रणजीत मंडल हे केस, विग आणि हेअर एक्स्टेंशन बनवणाऱ्या कंपन्यांना विकतात. विग आणि हेअर एक्स्टेंशन बनवले जातात या केसांना भारतीय बाजारपेठेत तसेच परदेशातही मोठी मागणी आहे.

पोलिसांनीही गुन्हा दाखल करून या प्रकरणाचा तपास सुरू केला असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्यांची ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरू आहे. चोरी व्हावी अशा वस्तूंच्या यादीत आतापर्यंत केस नव्हते. आता मात्र चोरांच्या यादीत केसांचा समावेश झाला आहे. त्यामुळं आता केसांवरही पाहारा लावावा का असा प्रश्न गंमतीनं विचारला जातोय.