लखनऊ : इलाहाबादमध्ये झालेल्या एका अपघातात केंद्रीय मंत्री अनुप्रिया पटेल जखमी झाल्या आहेत. हा अपघात इलाहाबादमधील कोरवा गांवात झाला आहे. अनुप्रिया यांच्या डोक्याला यामुळे दुखापत झाली आहे.
अनुप्रिया पटेल यांच्या ताफ्यातील गाड्या एकमेकांना ठोकल्याने हा अपघात झाला आहे. इलाहाबादमध्ये अपना पक्षाचे शहर अध्यक्ष आनंद ओझा यांनी सांगितलं की, त्या बिना प्रोटोकॉलच्या निघाल्या होत्याय त्यांच्यासोबत फक्त २ ते ३ लोकं होती. या अपघातात त्या किरकोळ जखमी झाल्या आहेत.
Cars in Union Minister Anupriya Patel's convoy collided with each other in #Allahabad, Minister sustained minor injuries (File pic) pic.twitter.com/eEYHOF6D73
— ANI UP (@ANINewsUP) December 31, 2017