या ५ उपायांनी तुमचे पोट बिघणार नाही

पावसाळ्यात साथीचे आजार डोके वर काढतात. यावेळी आरोग्याची योग्य काळजी नाही घेतली तर पोटाचे विकार होण्याचा धोका असतो. 

Updated: Aug 11, 2017, 11:43 PM IST
या ५ उपायांनी तुमचे पोट बिघणार नाही title=

मुंबई : पावसाळ्यात साथीचे आजार डोके वर काढतात. यावेळी आरोग्याची योग्य काळजी नाही घेतली तर पोटाचे विकार होण्याचा धोका असतो. 

१. पावसाळ्यात आल्याचे सेवन अधिक करा. चहामध्येही आल्याचा वापर जरुर करा.

२. लसणाचे सेवन पावसाळ्यात करणे गरजेचे. रोज सकाळी रिकाम्या पोटी एक लसणाची पाकळी गरम पाण्यासोबत घ्या.

३. एक ग्लास ताकात मध मिसळून प्या. यामुळे पाचनशक्ती सुधारते. पोटाच्या समस्या दूर होतील.

४. रोज एक ग्लास कोमट पाण्यात चिमूटभर सैंधव मीठ मिसळा. यामुळे पोटाचे आरोग्य चांगले राहील.

५. रोज सकाळी एक ग्लास लिंबू पाणी प्या. यामुळे पाचनशक्ती सुधारेल तसेच पोटाशी संबंधित समस्या दूर होतील.