मुंबई : हवामानात बदल होताच आजारपण सुरू होतं. सर्दी-खोकला, ताप, अशक्तपणा, कणकण असे बारीक-सारीक आजारांना आमंत्रण मिळतं. याचे मुख्य कारण म्हणजे रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. मात्र तुम्ही जर काही विशेष काळजी घेतली तर तुम्ही आजारपण दूर ठेऊ शकता. थंडीत फिट आणि हेल्दी राहण्यासाठी सेलेब्रिटी न्यूट्रिशनिस्ट रुजूता दिवेकर हिने हंगामी फळे व भाज्या खाण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढीस लागते आणि परिणामी तुमचे आरोग्य राखले जाते. जाणून घेऊया तुम्ही थंडीत आहारात कोणत्या फळे-भाज्यांचा समावेश कराल ते....
१. हंगामी फळे खाल्याने इम्युनिटी सिस्टम मजबूत होते आणि इन्फेशनपासून बचाव होण्यास मदत होते.
२. त्यामुळे तुमचे स्नायू मजबूत होतात. व स्नायुंचे दुखणे, त्रास यापासून सुटका होते.
३. वजन कमी असल्यास वजन वाढण्यास व हेल्दी-फिट राहण्यास मदत होते.
पपई
संत्र
मोसंब
द्राक्ष
डाबिंळ
स्ट्रॉबेरीज
अंजीर
चिकू
पालक
मेथी
चवळी
मुळा
बटाटा
कांदा
गाजर
दूधी
फ्लॉवर
कोबी
मटार
बाजरी
गहू
तांदूळ
मका
राजगिऱ्याचे पीठ
शिंगाड्याचे पीठ
चणाडाळ
कुळीथ
छोले
मटार
उडीद
तूरडाळ
राजमा
सोयाबीन