VIDEO : महाकुंभमधील Viral Girl मोनालिसाच्या मॉर्डन वेस्टर्न कपड्यातील लूकमागील Video चं सत्य समोर

Maha Kumbh Viral Girl Monalisa : महाकुंभ 2025 मधून व्हायरल झालेली व्हायरल गर्ल मोनालिसाच्या त्या व्हिडीओंचं सत्य आलं समोर... 

दिक्षा पाटील | Updated: Feb 8, 2025, 01:52 PM IST
VIDEO : महाकुंभमधील Viral Girl मोनालिसाच्या मॉर्डन वेस्टर्न कपड्यातील लूकमागील Video चं सत्य समोर title=
(Photo Credit : Social Media)

Maha Kumbh Viral Girl Monalisa : सध्या प्रयागराजमध्ये सुरु असलेल्या महाकुंभमध्ये इंदूरवरून माळ विकायला आलेल्या मोनालिसाचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होक आहेत. तिच्या डोळ्यांनी सगळ्यांना वेड लावलं आहे. तिचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्या एका व्हायरल झालेल्या व्हिडीओनंतर एका रात्रीत ती सेलिब्रिटी झाली आहे. इतकंच नाही तर चित्रपटांच्या ऑफर तिला मिळत असल्याचं म्हटलं जातं आहे. याशिवाय अभिनयाचे धडे घेण्यासाठी ती मुंबईला आली असं देखील सांगितलं गेलं. या सगळ्यात सोशल मीडियावर मोनालिसाचे एकापाठोपाठ एक व्हिडीओ व्हायरल होत आहेत. सध्या तिचा एक डान्सचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. पण हा व्हिडीओ खरंच तिचा आहे का असा प्रश्न अनेकांना पडला आहे. 

खरंतर सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये मोनालिसा डान्स करताना दिसत आहे. पण यात ती स्वत: नसून तिचे हे डीपफेक व्हिडीओ आहेत. मोनालिसाचे हे व्हिडीओ फेक आहेत. तर तिचे हे व्हिडीओ फेस स्वॅप या टेक्नॉलॉजीच्या मदतीनं बनवण्यात आले आहेत. फक्त हा एकच व्हिडीओ नाही तर मोनालिसाचे असे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. मोनालिसाच्या या एआय जनरेटेड व्हिडीओला लोकांकडून पसंती मिळत आहे. बॉलिवूडच्या गाण्यांवर तिचे अनेक व्हिडीओ तयार करण्यात आले आहेत. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Durgesh Parjapti (@modi_ji_prajapati_9644)

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by ni8.out9Star (@ni8.out9)

हेही वाचा : तू अभिनय कधी शिकणार? साई पल्लवीच्या प्रश्नावर नागा चैतन्य म्हणाला...

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by ni8.out9Star (@ni8.out9)

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओंमध्ये कधी मोनालिसा ही बॉलिवूडच्या आयटम सॉन्गवर डान्स करते तर कधी ती विमानतळावर पापाराझींना पोझ देताना दिसते. इतकंच नाही तर एका व्हिडीओत तर चक्क तिनं तिच्या आगामी चित्रपटासाठी शूटिंग सुरु केल्याचं म्हटलं जात आहे. त्यात असलेलं गाण्याचं शूटिंग झालं असून पहिलं गाणं प्रदर्शित झाल्याचं म्हटलं आहे. मोनालिसाचे असे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. तर काही नेटकऱ्यांच्या हे लक्षात आलं की हे डिपफेक आहे. तर त्यांनी लगेच कमेंट करत म्हटलं की असं असलं तरी मोनालिसा ही खरंच सुंदर आहे. अनेकांनी हे चुकीचं असल्याचं म्हटलं आहे. तर काहींनी तिच्या सुंदरतेची स्तुती केली आहे.