तू अभिनय कधी शिकणार? साई पल्लवीच्या प्रश्नावर नागा चैतन्य म्हणाला...

Naga Chaitanya -Sai Pallavi : साई पल्लवीनं नुकत्याच सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केलाय त्यावेळी तिनं थेट नागा चैतन्यला त्याच्या अभिनयावरून प्रश्न विचारला आहे. 

दिक्षा पाटील | Updated: Feb 8, 2025, 01:14 PM IST
तू अभिनय कधी शिकणार? साई पल्लवीच्या प्रश्नावर नागा चैतन्य म्हणाला... title=
(Photo Credit : Social Media)

Naga Chaitanya -Sai Pallavi : दाक्षिणात्य अभिनेता नागा चैतन्य आणि साई पल्लवी गेल्या बऱ्याच काळापासून त्यांच्या थंडेल या चित्रपटामुळे चर्चेत आहेत. त्यांचा बहुप्रतिक्षित चित्रपट थंडेल हा थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. तर चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या एक दिवस आधी साई पल्लवीनं तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून एक व्हिडीओ शेअर केला. त्यात तिनं तिचा सल कलाकार नागा चैतन्यला काही प्रश्न विचारल्याचे पाहायला मिळते. 

साई पल्लवीनं नागा चैतन्यची यावेळी मुलाखत घेतली होती. या दरम्यान, साईनं नागा चैतन्यला विचारलं की माझे काही प्रश्न आहेत आणि काही चाहत्यांना असलेले प्रश्न आहेत. तर त्यावेळी साईनं नागा चैतन्यला प्रश्न विचारला की 'तू अभिनय कधी शिकणार?' या प्रश्नाचं उत्तर देत नागा चैतन्य म्हणाला, 'मी अभिनय कधी शिकणार, त्याचा अर्थ काय? प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर मला वाटतं की ही कायम अर्थात कधी न संपणारी प्रोसेस आहे. हे असं आहे की तुम्ही या गोष्टीला वेळेनुसार शिकत राहतात. मला वाटतं नाही की तुम्ही कधी पूर्णपणे अभिनय शिकू शकतात. जर शिकण्याची प्रोसेस सोडली तर तुम्ही एक अभिनेता म्हणून कधी पुढे जाऊ शकणार नाही. मी अजूनही पूर्णपणे अभिनय शिकलेलो नाही, मी रोज काही तरी वेगळं शिकतोय.'

गलाटा प्लसला दिलेल्या मुलाखतीत नागा चैतन्यनं ट्रोलिंगला घेऊन वक्तव्य केलं आहे. नागा चैतन्य म्हणाला, सुरुवातीला ट्रोलिंगचा माझ्यावर खूप परिणाम व्हायचा. मला फक्त ट्रोलर्सला हे विचारायचं आहे की त्यांना हे सगळं का करायचं आहे? प्रत्येक व्यक्ती त्याला हवं तसं आयुष्य जगत आहे. त्यामुळे लोकांनी दुसऱ्यांच्या आयुष्यात ढवळाढवळ का करावी? एक वेळनंतर मी या सगळ्यांकडे दुर्लक्ष करायला सुरुवात करणार आहे. मला वाटलं नव्हतं की मला सगळ्याच गोष्टींवर प्रतिक्रिया देण्याची गरज आहे. 

हेही वाचा : दीपिका कक्कडनं पहिल्या लग्नातून झालेल्या मुलीला सोडलं? नवरा शोएबनं सांगितलं सत्य

थंडेल चित्रपटाचं दिग्दर्शक चंदू मोंडेतीनं केलं आहे. चित्रपटात नागा आणि साई पल्लवीशिवाय प्रकाश बेलावाडी, दिव्या पिल्लई, राव रमेश आणि करुणाकरण देखील आहेत. रिपोर्ट्सनुसार, चित्रपटाचं बजेट हे 90 कोटी आहे. दरम्यान,थंडेलच्या आधी नागा चैतन्य आणि साई पल्लवी हे दोघं 2021 मध्ये एकत्र दिसले होते.