Sushmita Sen Daughter: भारताची मिस्ड वर्ल्ड म्हणून नावाजलेली सुष्मिता सेन आजसुद्धा बॉलिवूडमधील नामांकित अभिनेत्रींमध्ये ओळखली जाते. 90 च्या दशकातील ही अभिनेत्री नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. सौंदर्याच्या बाबतीत बऱ्याच तरुणींना मागे टाकणाऱ्या या अभिनेत्रीने 1994 साली मिस वर्ल्डचा किताब जिंकला होता. सुष्मिताचे नाव बऱ्याच अभिनेत्यांसोबत जोडले जात असूनसुद्धा 49 वर्षाच्या वयामध्ये ती अविवाहित राहिली आहे. ब्यूटी पेजेंट जिंकल्यानंतर बरोबर 6 वर्षांनी म्हणजेच 2000 साली तिने एका मुलीला दत्तक घेतले होते. सुष्मिताने दत्तक घेतलेल्या मुलीचे नाव 'रेनी' असे आहे. रेनी ही सध्या आपल्या गायनकौशल्यामुळे सोशल मिडीयावर प्रसिद्धी मिळवत आहे.
सोशल मिडीयावर रेनीचे गाणे गात असतानाचे व्हिडीओ व्हायरल होत आहेत. व्हिडीओमधील गाण्याने रेनी नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. नुकताच, रेनीचा एक नवा व्हिडीओ सोशल मिडीयावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये बॉलिवूडची स्टार असलेल्या आपल्या आईचं गाणं गाताना ती दिसत आहे.
सुष्मिता सेनची मुलगी रेनी सेन ही 25 वर्षांची असून ती नेहमी वेगवेगळी गाणी गात असतानाचे व्हिडीओ सोशल मिडीयावर शेअर करत असते. तिचे व्हिडीओ चाहत्यांच्या पसंतीस उतरताना दिसत आहेत. रेनीला संगीत क्षेत्रातच काम करण्याची इच्छा असल्याचे तिच्या सोशल मिडीयावरील व्हिडीओवरुन स्पष्ट होत आहे. अशातच तिच्या इंस्टग्राम अकाउंटवर तिने आपल्या आईच्या गाण्याचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. रेनी या व्हिडीओमध्ये शाहरुख खान आणि सुष्मिता सेन यांच्या 'मैं हू ना' या चित्रपटातील प्रसिद्ध गाणं 'तुम्हें जो मैंने देखा' अनोख्या पद्धतीत गाताना दिसत आहे. चिपटातील शाहरुख आणि सुष्मिताच्या या गाण्याला आजही प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. रेनीच्या या गाण्याच्या व्हिडीओला चाहत्यांच्या अत्यंत चांगल्या प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत.
सुष्मिता सेनच्या मुलीच्या गाण्यावर बऱ्याच लोकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. रेनीने गायलेलं हे गाणं चाहत्यांच्या पसंतीस उतरत असल्याचं त्यांच्या प्रतिक्रियांवरुन स्पष्ट होत आहे. रेनीला नेटकऱ्यांच्या खूप चांगल्या प्रतिक्रिया मिळाल्या. 'गोड आवाज', 'सुंदर आवाज', 'अप्रतिम' नेटकऱ्यांच्या अशा अनेक प्रतिक्रिया पाहायला मिळाल्या. तसेच, 'वाह रेनी, खूप छान' असेदेखील एका नेटकऱ्याने लिहिले आहे. लोकांनी रेनीच्या गाण्यावर कमेंट बॉक्समध्ये बरेच फायर इमोजी देखील पोस्ट केले आहेत.