Side Effects of Ghee: भारतीयांच्या जेवणात तूप महत्त्वाची भूमिका बजावत असते. आपल्यापैकी बरेचजण आहारात आवर्जून तूपाचा समावेश करतात. जेवणाची चव वाढवण्याव्यतिरिक्त तूप हे आरोग्यासाठी सुद्धा अत्यंत फायदेशीर असते. तूपामध्ये आरोग्यासाठी लाभदायक असणारे अनेक पोषक तत्त्वं असतात. तूपामध्ये फॅट तसेच व्हिटॅमिन ई, डी आणि ए सारखे घटक आढळतात. तूपाचे सेवन केल्याने त्वचा आणि केसांना तर फायदा होतोच पण याव्यतिरिक्त स्नायू आणि हाडं मजबूत होण्यास मदत होते. इतके आरोग्यादायी गुणधर्म असणारे तूप मात्र, काहीवेळा आरोग्यासाठी घातक ठरु शकते. असे काही आजार आहेत की ज्यामध्ये तूपाचे सेवन केल्याने शरीराला नुकसान पोहचू शकते.
अमेरिकन जर्नल ऑफ गैस्ट्रोअॅंटरोलॉजी मध्ये प्रकाशित झालेल्या अध्ययनानुसार, तूपामध्ये मोठ्या प्रमाणात फॅट असते. त्यामुळे तूपाचे सेवन केल्यामुळे पचनाशी संबंधित आजार होण्याची शक्यता असते. म्हणून कमकुवत पचनशक्ती असणाऱ्यांनी तूपाचे सेवन करणे टाळले पाहिजे. अधिक प्रमाणात तूपाचे सेवन केल्याने ब्लोटींग, मळमळ आणि अपचनासारख्या समस्या उद्भवू शकतात.
तूपामध्ये सॅच्युरेटेड फॅट जास्त प्रमाणात असल्यामुळे त्याचे सेवन केल्याने कधीकधी लिव्हवरवर दबाव पडू शकतो. यामुळे गंभीर आजारांचा धोका उद्भवू शकतो. हृदयाशी संबंधित आजारांनी ग्रस्त असलेल्यांना सुद्धा तूपाचे सेवन धोक्याचे ठरु शकते. तूपात चरबीचे प्रमाण जास्त असल्याने शरीरातील कोलेस्टेरॉलची पातळी वाढू शकते.
ज्या लोकांना दूधाची किंवा दूधापासून बनलेल्या पदार्थांची अॅलर्जी आहे त्या लोकांनी तूपाचे सेवन करणे टाळले पाहिजे. अशा परिस्थितीत तूपाचे सेवन केल्याने चेहऱ्यावरील पुरळ, पित्त, उलट्या, गॅस आणि अतिसार यासारख्या समस्या उद्भवू शकतात.
(Disclaimer: इथे देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे. याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)