वडिलांच्या निधनानंतर कोलमडलेली 'ही' अभिनेत्री; आज आहे 65,00,00,000 कोटींची मालकीण

Bollywood Actress Old Photo : जुने फोटो हाती लागले की तो प्रत्येक फोटो आणि त्यामागची आठवण हळूच डोकावते आणि तासन् तासही त्या एकाच फोटोची चर्चा होते. हा असाच एक फोटो...   

सायली पाटील | Updated: Feb 18, 2025, 03:03 PM IST
वडिलांच्या निधनानंतर कोलमडलेली 'ही' अभिनेत्री; आज आहे 65,00,00,000 कोटींची मालकीण
650 Crore Networth actress Top Class Bollywood Actress Priyanka Chopra Childhood photo

Bollywood Actress Old Photo : माणसं मोठी होतात, वयानं, अंगाखांद्यानं, अनुभवानं. पण, सरता काळ आणि बालपण, आठवणी मात्र मागे पडत जातात. जीवनातील नवनवीन अनुभवांमध्ये या आठवणी मागे पडल्या असल्या तरीही त्या व्यक्तीशी कायमस्वरुपी जोडल्या गेल्या असल्यानं जेव्हाजेव्हा त्यांना उल्लेख होतो तेव्हातेव्हा त्या सुखद अनुभव देऊन जातात. असाच छानसा अनुभव घेतला आहे एका आघाडीच्या बॉलिवूड अभिनेत्रीनं. एक अशी अभिनेत्री जी सध्या संपूर्ण जगात तिच्या कलेच्या बळावर लोकप्रियता मिळवत आहे. 

अनेक प्रतिस्पर्धी अभिनेत्रींवर मात करत मोठ्या कलाकारांसोबत स्क्रीन शेअर करणारी ही अभिनेत्री तिच्या सौंदर्यासोबतच तिच्या व्यवसाय कौशल्यासाठीसुद्धा अनेकांच्याच आदर्शस्थानी आहे. जागतिक स्तरावर युनिसेफच्या अनेक उपक्रमांमध्ये सहभागी होणारी आणि थेट हॉलिवूडपर्यंच मजल मारणाही ही अभिनेत्री आहे प्रियांका चोप्रा. 

जुन्या राजदूत बाईकवर अगदी ऐटीत बसून फोटो काढणारी ही लहानगी म्हणजे प्रियांका चोप्रा. खोडकर हावभाव, चेहऱ्यावर मोठ्या आकाराचा चष्मा आणि मोकळ्या मैदाना आपल्याच आनंदावर स्वार होणारी प्रियांका तुम्हाला कशी वाटली? बालणीचे दिवस आठवले ना? प्रियांकानं नुकतंच इन्स्टाग्रामच्या माध्यमातून तिचे काही जुने फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये प्रियांकाच्या बालपणीपासून शालेय जीवन आणि अगदी महाविद्यालयीन दिवसांचे फोटोसुद्धा पाहायला मिळत आहेत. 

गतकाळातले दिवस आठवून आणि हे फोटो पाहून प्रियांकानंही ते न्याहाळताना तासन् तासांचा वेळ दवडला असेल असं म्हणणं गैर ठरणार नाही. आश्चर्याची बाब म्हणजे या प्रत्येक फोटोसह असणारी आठवणही तिनं कॅप्शनमध्ये एका ओळीत लिहिली आहे. आयुष्यात बरंच पुढे आल्यानंतर मागे वळून पाहताना नेमकं काय दिसलं, याचच उदाहरण म्हणजे प्रियांकाची ही खिळवून ठेवणारी पोस्ट. 

हेसुद्धा वाचा : पर्वतांनी वेढलेल्या लडाखमधील 'या' रहस्यमयी गावात गर्भधारणेसाठी येतात परदेशी महिला; कारण जगाला थक्क करणारं 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Priyanka (@priyankachopra)

आजच्या घडीला जवळपास 650 कोटींची संपत्ती असणारी प्रियांका चोप्रा जगभरातील चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. फक्त अभिनय नव्हे, तर चित्रपट जगताशी संलग्न अनेक क्षेत्रांमध्येही ती सक्रिय आहे. प्रियांका चोप्राच्या जीवनात वडिलांच्या निधनानंतर ती पुरती कोलमडली होती. पण, या धक्क्यातून सावरत तिनं कुटुंबाला आधार दिला आणि पुन्हा नव्यानं सुरुवात केली.