बाबोओ... फक्त बूट आणि कपडे ठेवण्यासाठी 'या' अभिनेत्याने विकत घेतलाय 3 BHK फ्लॅट

Actor Baught New Falt just to Store Shoe and Clothes : अभिनेत्यानं एका मुलाखतीत हा खुलासा केला आहे की त्यानं फक्त बूट आणि कपडे ठेवण्यासाठी फ्लॅट खरेदी केला आहे. 

दिक्षा पाटील | Updated: Jan 26, 2025, 12:26 PM IST
बाबोओ... फक्त बूट आणि कपडे ठेवण्यासाठी 'या' अभिनेत्याने विकत घेतलाय 3 BHK फ्लॅट title=
(Photo Credit : Social Media)

Krushna abhishek New Falt : लोकप्रिय कॉमेडियन आणि अभिनेता कृष्णा अभिषेक 'लाफ्टर शेफ्स' च्या दुसऱ्या सीजनमध्ये त्याची पत्नी आणि अभिनेत्री कश्मीरा शाहसोबत दिसली होती. पण त्या आधी तिचा एक व्हिडीओ अर्चना पूरन सिंगच्या यूट्यूब चॅनलवर दिसली. त्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात तिनं धक्कादायक असे अनेक खुलासे केले आहेत. यासोबत महागडे आणि डिझायनर बुटं आणि कपडे खरेदी करण्याची आवड असणाऱ्या कृष्णानं कसं कलेकश्न सुरु केलं याविषयी सांगितलं. त्यावेळी अर्जनानं खुलासा केला की कृष्णानं फक्त कपडे आणि बुटं ठेवण्यासाठी 3BHK फ्लॅट खरेदी केला. 

अर्चन पूरन सिंगशी बोलताना कृष्णा अभिषेकनं सांगितलं की 'जेव्हा तो छोटा होता. तेव्हा तो त्याचा मामा गोविंदाचे कपडे परिधान करायचा. त्याला वाटायचं की फॅशन ब्रॅंड DnG ला डेव्हिड धवन आणि गोविंदानं त्यांच्या नावाच्या पहिल्या अक्षरांना मिळून बनलवलं. त्यानं सांगितलं की जेव्हा मी कॉलेजमध्ये होतो, तेव्हा तो सगळ्या ब्रॅंडचे कपडे परिधान करायचा. आम्हाला ब्रॅंडविषयी काही कल्पना नव्हती, पण त्यावेळी प्राडा, गुच्ची सारख्या ब्रॅंडचे कपडे परिधान करायचे. त्यांची नावं कशी घेतात हे मी नुकतचं शिकलो. संपूर्ण आयुष्य माझ्या मामानं  DnG चे कपडे परिधान केले. अनेक वर्ष मी या ब्रॅंडचे शर्ट आणि जॅकेट परिधान केले. अनेक वर्ष मी हाच विचार करत राहिलो की DnG चा अर्थ डेव्हिड आणि गोविंदा आहे. मला वाटायचं की तो इतका लोकप्रिय आहे की त्यानं स्वत:चं एक ब्रॅंड सुरु केलं असणार.'

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

या सगळ्या चर्चांमध्ये कृष्णानं सांगितलं की 'कशा प्रकारे गेल्या काही वर्षांमध्ये त्याच्याकडे ब्रॅंडेड बुटांचं कलेक्शन आहे. त्यांना ठेवण्यासाठी एक वेगळी प्रॉपर्टी देखील खरेदी करावी लागली. कृष्णा म्हणाला, मी एक घर खरेदी केलं आहे आणि त्याला बुटीकचं रुप दिलंय. हे ऐकल्यानंतर परमीत सेठीला आश्चर्य झालं आणि अर्चनानं सांगितलं की हो, त्यानं कपडे आणि बुटं ठेवण्यासाठी फक्त 3BHK फ्लॅट खरेदी केला आहे.'

कृष्णानं हसत सांगितलं की मी दर सहा महिन्यांनी लॉट शिफ्ट करतो. अर्चना लगेच मस्करीत म्हणाली, माझा मुलगा आयुष्मानची उंची आणि बॉडी तुझ्या एवढीच आहे. त्यामुळे लॉट शिफ्ट करताना जे काही तुला आवडत नसेल ते आयुष्मान देत जा. 

हेही वाचा : मुलीच्या जन्मानंतर पहिल्यांदाचा रॅम्पवर दिसली दीपिका पदुकोण; लूक पाहून नेटकऱ्यांना वाटलं रेखाच आल्या...

कृष्णा अभिषेक आणि अर्चना पूरन सिंगला सगळ्यात शेवटी 'द ग्रेट इंडियन कपिल शो' शोमध्ये दिसली होती. त्याचा हा शो Netflix वर पाहायाला मिळतोय.