मुंबई : 'बिग बॉस 15' शोला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. शोमधील खेळ आणि रंगणारे वाद प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत. शोमध्ये आता फक्त वाद आणि विवादाची चर्चा रंगत नसून स्पर्धकांमध्ये जवळीक देखील वाढत आहे. शोमध्ये आता प्रेमाचे वारे वाहात आहेत, असं म्हणायला हरकत नाही. माइशा आणि ईशानच्या प्रेम प्रकरणानंतर आता करण कुंद्रा आणि शमिता शेट्टी दोघांच्या नात्याची चर्चा रंगत आहे. काही प्रेक्षकांचं म्हणणं आहे की, करण कुंद्राच्या मनात शिल्पा शेट्टीने घर केलं आहे?
एका एपिसोडमध्ये करण कुंद्रा, तेजस्वी प्रकाश, अकासा सिंह, विधि पांड्या स्वयंपाक घरात उपस्थित होते. तेव्हा तेजस्वी प्रकाश, करणला विचारते तूला शमिता शेट्टी आवडते का? यावर करण म्हणतो, 'मी माझ्या आयुष्यात कधी तिच्यासोबत नीट बेललो देखील नाही. तिची पर्सनालिटी प्रचंड स्ट्रिक्ट आहे....' त्यानंतर करण जोर-जोरात हसू लागतो.
करणसोबत त्याठिकाणी असलेल्या सर्व मुली हसू लागतात. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून शमिता शेट्टी आणि अभिनेता राकेश बापटच्या नात्याची चर्चा जोरदार रंगाली आहे. एवढंच नाही तर दोघांनी त्यांच्या नात्याची कबुली देखील दिली आहे. त्यात आता शमिता आणि करणच्या नावाची चर्चा रंगल्यामुळे प्रेक्षकांमध्ये तर्क वितर्क लढविले जात आहेत.
'बिग बॉस 15' मध्ये शमिता कायम राकेशला मिस करत असते. त्यामुळे घरात शमिता आणि करणची मैत्री किती दिवस टिकते हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे. एकंदर पाहाता शो आता रंगतदार वळणावर आला आहे. प्रेक्षकाचं लक्ष आता प्रत्येक स्पर्धकाच्या खेळीकडे आहे.