Deva Tariler Out: बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूरचा बहुप्रतीक्षित ॲक्शन थ्रिलर 'देवा' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. झी स्टुडिओ आणि रॉय कपूर फिल्म्सचा हा सिनेमाही खास आहे, कारण पुन्हा एकदा शाहिद कपूर पोलिसाच्या भूमिकेत दिसणार आहे. 'फटा पोस्टर निकला हिरो'मध्ये तो कॉमिक स्टाईलमध्ये दिसला होता पण यावेळी तो फुल ॲक्शन असणार आहे.
चित्रपटाच्या निर्मात्यांनी चाहत्यांच्या प्रचंड मागणीनंतर 'देवा' चित्रपटाचा ट्रेलर वेळेआधी रिलीज केला आहे. चित्रपटाच्या गाण्यांनी आणि टीझरने चाहत्यांची उत्कंठा तर वाढवलीच होती. मात्र, अशातच आता 'देवा' चित्रपटाच्या ट्रेलरने चाहत्यांचा उत्साह आणखी वाढला आहे.
ट्रेलरमध्ये नेमकं काय?
'देवा' चित्रपटाचा ट्रेलर हा 2 मिनिटे 18 सेकंदाचा आहे. ज्याची सुरुवात खूप सस्पेन्सने होते. सुरुवातीलाच शाहिद कपूरचा आवाज येतो. पण ट्रेलरमध्ये चाहत्यांना अभिनेत्याची पहिली झलक पाहण्यासाठी थोडा वेळ वाट पाहावी लागणार आहे. शाहिद कपूर देवा अंबरेच्या व्यक्तिरेखेत पूर्णपणे तल्लीन झाल्याचे ट्रेलरमध्ये दिसून येत आहे. ट्रेलरमधील शाहिद कपूरची अॅक्शन आणि जबरदस्त स्टंट पाहून चाहते थक्क होतील. चित्रपटाच्या ट्रेलरवरून हे स्पष्ट होते की, शाहिद कपूर त्याच्या 'देवा' चित्रपटाद्वारे ॲक्शन चित्रपटांचा स्तर उंचावणार आहे.
त्यासोबतच या चित्रपटाची कथा प्रेक्षकांना त्यांच्या जागेवर चिकटून ठेवेल. 'देवा'च्या ट्रेलरमधील शाहिद कपूरची स्टाईल लोकांना प्रचंड आवडली आहे. 'देवा'चा ट्रेलर समोर येताच X वर शाहिद कपूर लोकप्रिय झाला आहे. सर्वजण शाहिदचे कौतुक करत आहेत. अशा परिस्थितीत लोकांना आता चित्रपटाकडून खूप अपेक्षा आहेत.
या दिवशी होणार रिलीज
'देवा' चित्रपटात शाहिद कपूरसोबत पूजा हेगडे देखील दिसणार आहे. कुब्बरा सेंट, पावेल गुलाटी आणि प्रवेश राणा हे देखील या चित्रपटात दिसणार आहेत. हा चित्रपट रोशन एंड्रयूज यांनी दिग्दर्शित केला असून तो 31 जानेवारी 2025 रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.