Saif Ali Khan Attack : बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर गुरुवारी रात्री 2 च्या सुमारास एका संशयिताने चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात सैफला मान आणि मणक्यासह सहा ठिकाणी दुखापत झाली आहे. सर्वात धोकादायक इजा पाठीच्या कण्याला झाली आहे. चाकूचा 2.5 इंच तुकडा तुटला होता आणि सैफच्या पाठीच्या कण्यामध्ये अडकला होता. डॉक्टरांच्या टीमने 6 तासांच्या शस्त्रक्रियेनंतर तो तुकडा काढला. त्याचवेळी, डॉक्टरांनी असेही सांगितलं की जर जखम 2 मिमी खोल असती तर त्यामुळे सैफला अर्धांगवायू झाला असता.
मात्र, आता सैफ पूर्णपणे धोक्याबाहेर असून प्रकृतीत सुधारणा होत आहे. त्याच्या प्रकृतीतही झपाट्याने प्रगती होत आहे. डॉक्टरांनी त्याला पूर्ण विश्रांतीची सूचना दिली आहे. सैफला आयसीयूमधून वॉर्डमध्ये हलवण्यात आले आहे, अशी माहिती लीलावती हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी दिली आहे. प्रथम मणक्याचे नंतर कॉस्मेटिक असं 6 तासांचं ऑपरेशन झालं. डॉक्टरांना सांगितलं की, शस्त्रक्रियेनंतर शुद्धीवर आल्यानंतर सैफ अली खानने त्यांना दोन प्रश्न विचारले.
डॉक्टरांनी सांगितलx की सैफ स्वतः जखमी अवस्थेत हॉस्पिटलमध्ये आला होता. त्यांच्यासोबत त्यांचा मुलगा तैमूर होता. सैफ रक्ताच्या थारोळ्यात पडला होता पण तरीही धीर सोडला नाही. तो सिंहासारखा चालत आपत्कालीन स्थितीत आल्याचे डॉक्टरांनी सांगितलं. खरा हिरो अशी डॉक्टरांनी सैफ अली खानचा उल्लेख केलाय.
शुद्धीवर आल्यानंतर सैफने प्रथम डॉक्टरांना काय विचारलं हे जाणून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल. सैफने डॉक्टरला विचारलं की, तो शूट करू शकेल का? यानंतर त्याने विचारलं की त्याला जिममध्ये जाण्यात काही अडचण आहे का? सैफच्या प्रश्नांवर डॉक्टरांनी त्याला आश्वासन दिलं आणि सांगितलं की, 2 आठवड्यांनंतर तू जिम आणि शूटिंग करू शकशील पण तुला 2 आठवडे योग्य विश्रांती घ्यावी लागणार आहे.
त्यांना भेटण्यासाठी जेवढे कमी लोक येतील तेवढं त्यांच्या आरोग्यासाठी चांगले राहील, असेही डॉक्टरांनी सांगितलंय. गेल्या 24 तासांत त्यांच्या प्रकृतीत झपाट्याने सुधारणा झाल्याचेही डॉक्टरांनी सांगितलं. डॉक्टरांनी सांगितलं की, सैफ जेव्हा हॉस्पिटलमध्ये आला तेव्हा त्याला दुखण्यामुळे हालचाल करता येत नव्हती, आता त्याने हालचाल सुरू केली आहे. लीलावती हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी त्यांना रिअल हिरो म्हटलंय.