Saif Ali Khan Attack : बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर गुरुवारी मध्यरात्री मुंबईतील राहत्या घरी दरोडेखोराने चाकूने हल्ला केला. ज्यात सैफ गंभीर जखमी झाला. या घटनेनंतर बॉलिवूडमध्ये खळबळ माजली आहे. या अज्ञात हल्लेखोराने सैफवर एकूण 6 ठिकाणी वार केले. गंभीर अवस्थेत रक्ताने माखलेल्या सैफला ऑटो रिक्षातून लीलावती रुग्णालयात नेण्यात आलं. प्रथम मिळालेल्या अहवालानुसार ऑटो रिक्षातून सैफ अली खानला त्याचा मोठा मुलगा इब्राहिम घेऊन गेला होता, अशी माहिती समोर आली होती. पण आता इब्राहिम की तैमूर अशी चर्चा सोशल मीडियासह तर गुगल या प्रश्नाचं उत्तर सर्च केलं जातं.
सैफ अली खानवर हल्लेखोराने एवढे वर्मी वार केलेत ज्यात सैफ लकव्यापासून थोडक्यात बचावलाय. कारण त्याच्या पाठीवरील वार जर 2 एमएम जरी अजून आत शिरला असता तर सैफची स्पायनल कॉड डॅमेज झाली असती आणि सैफला लकवा मारण्याचाही धोका होता. मात्र यातून सैफ थोडक्यात बचावल्याचं डॉक्टरांनी सांगितलंय. पाठीचा मणका आणि आणि मज्जातंतू हे माणसाच्या शरीरातील अतिशय संवेदनशील असे भाग आहे.. त्याला जर इजा झाली तर माणसाला लकवा मारण्याचाही धोका होता. आणि हाच धोका सैफ अली खानच्या बाबतीतही होता आणि तो थोडक्यात टळलाय.
लीलावती रूग्णालयात सैफ अली खानवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांच्या टीमने पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत सांगितलं की, सैफ अली खान जेव्हा हॉस्पिटलमध्ये आले मी तो पहिला डॉक्टर आहे, ज्याने त्यांना पाहिलं. त्यांच्या शरीरावर जखम्या आणि रक्त होतं. ते एका सिंहासारखे चालत आले. त्यांच्या सोबत लहान मुलगा 6-7 वर्षांचा होता. त्यांचा मुलगा तैमूर असेल. चित्रपटामधील नाही तर खऱ्या हिरोसारखे. चित्रपटात हिरोगिरी करणे ठिक आहे. पण घरात हल्ला झाला त्यानंतर स्वत: हॉस्पिलटमध्ये येणे हे सोप नाही. त्यांची प्रकृती सध्या चांगली आहे.
#WATCH | Saif Ali Khan Attack Case | Niraj Uttamani, Chief Operating Officer of Lilavati Hospital says, "Saif Ali Khan is a real hero...He is doing well. He has been shifted from ICU to a normal room..." pic.twitter.com/3pucBkC8ys
— ANI (@ANI) January 17, 2025
त्यासोबत आज ज्या ऑटो रिक्षातून सैफ अली खान हॉस्पिटलला आला होता. तो भजन सिंह राणा यांनीदेखील त्या रात्री घडलेल्या सर्व प्रकार मीडियासमोर सांगितला आहे. सैफ जखमी अवस्थेत होता. त्यांच्यासोबत एक 7-8 वर्षांचा लहान मुलगा आणि एक तरुण होता. जो सैफ अली खानसोबत बसला होता. मग सैफने मला त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यास सांगितले.
#WATCH | Attack on #SaifAliKhan | Mumbai: Bhajan Singh Rana, autorickshaw driver who rushed the actor to Lilavati Hospital after the attack, says, "I drive my vehicle at night. It was around 2-3 am when I saw a woman trying to hire an auto but nobody stopped. I could also hear… pic.twitter.com/3pzoy2eoh6
— ANI (@ANI) January 17, 2025
त्यांच्यापैकी एकाने विचारले, 'आपण होली फॅमिलीला जावे की लीलावतीला?' यावर सैफ म्हणाला की मला लीलावतीला घेऊन जा. यानंतर मी त्याला लीलावती हॉस्पिटलकडे घेऊन गेलो. डॉक्टर आणि ऑटो रिक्षा चालक यांच्या विधानानंतर तैमूर सैफ अली खान हा आपल्या वडिलांना जखमी अवस्थेत हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला असं म्हटलं जातंय.