Lady Godiva Story : इतिहासाचे पाने जेव्हा आपण चाळतो तेव्हा अशा अनेक राजा आणि राणीचा कथा असतात ज्या वाचून आपण आश्चर्यचकित होतो. अशी एक सर्वात सुंदर आणि महान राणी होती, जी एका अटीसाठी संपूर्ण शहरात अंगावर एकही कपडा न घालता घोडावरुन फिरली. त्याचा या कृत्यामुळे तिची निंदा नाही तर तिचं कौतुक होतं. कोण होती ही राणी आणि तिच्यासमोर अशी कोणती अट होती याबद्दल आम्ही आज तुम्हाला सांगणार आहोत. इतिहासात या राणीचा उल्लेख महान राणी लेडी गोडिव्हा असा करण्यात आलाय.
सुमारे 900 वर्षांपूर्वी, किंग कॅन्यूटचा जन्म ब्रिटनमध्ये झाला होता. त्यांचा पत्नीचं नाव लेडी गोडिवा होतं. किंग कॅन्यूट लोकांकडून प्रचंड कर घेत होता. त्यामुळे लोक खूप नाराज होते. तर राणी लेडी गोडिव्हा ही दयाळू होती. तिला जनतेचं हे दु:ख सहन झालं नाही. म्हणून तिने तिचा नवरा किंग कॅन्युट याला प्रजेवरील कराचे ओझे कमी करण्यास किंवा माफ करण्याची विनंती केली.
पण राजाने राणीच्या दयाळूपणाची परीक्षा घेतली. राजाही काही कमी नव्हता. राणी लोकांच्या हितासाठी कुठपर्यंत जाऊ शकते हे राजाला जाणून घ्यायचे होतं. म्हणून त्याने राणीसमोर अशी कठीण आणि कधीच न शक्य होणारी अट ठेवली. जी अट कोणत्याही महिलाला कधीही स्वीकारणे फार कठीण होतं. असे म्हणता येईल की ते अशक्य होतं.
किंग कॅन्यूटने लेडी गोडिव्हा समोर एक अट घातली की जर ती लंडनच्या रस्त्यावर विवस्त्र फिरली तर तो जनतेवरील कराचा बोजा पूर्णपणे काढून टाकेल. राणीने ही अट मान्य केली आणि सांगितलं की ती घोड्यावर स्वार होऊन लंडनच्या रस्त्यावर अंगावर एकही कपडा न घालता फिरेल. या काळात शहरातील प्रत्येक घराच्या आणि इमारतीच्या खिडक्या आणि दरवाजे बंद राहतील आणि कोणीही घराबाहेर पडणार नाही. जनताही भावूक झाली आपली राणी आपल्यासाठी एवढा मोठा त्याग करतेय हे पाहून त्यांना राणीबद्दलचा आदर वाढला. आपल्या दयाळू राणीच्या या बलिदानाने लोकही आनंदित झाले. त्या दिवशी जेव्हा राणी विवस्त्र महालाचा बाहेर पडली सर्वजण घरातच राहिले आणि राणीने लंडनच्या रस्त्यांवर विवस्त्र फिरण्याची अट पूर्ण केली.
पण एका व्यक्तीने राणीला नग्नावस्थेत पाहण्याचे धाडस केले, ज्यामुळे तिला शिक्षा म्हणून त्याचे डोळे फोडण्यात आले. राणीचा आदर न केल्यामुळे त्याला ही शिक्षा देण्यात आली. यानंतर, राजाने वचनानुसार लोकांना करातून सूट दिली आणि राणी लेडी गोडिव्हाचे नाव जगातील महान राणींपैकी एक झाले. आजही ब्रिटनमध्ये लेडी गोडिव्हाचे नाव मोठ्या आदराने घेतलं जातं.