J0410−0139 Earliest and Most Distant Blazar in the Universe: ब्रम्हांड हे अनेक रहस्यांनी भरलेले आहे. याच ब्रम्हांडातील सर्वात मोठे रहस्य आहे ते ब्लॅकहोल (BlackHole). ब्रम्हांडात असाच एक सुपरमॅसिव्ह BlackHole सापडला आहे. 70 कोटी सूर्य सामावतील इतक्या महाकाय आकाराचा हा ब्लॅकहोल आहे. हा सुपरमॅसिव्ह BlackHole थेट पृथ्वीला टार्गेट करुन रहस्यमयी एनर्जी बीम पाठवत आहे. या शोधामुळे जगभरातील संशोधकांना मोठा धक्का बसला आहे.
नासाच्या चंद्रा वेधशाळा आणि चिलीच्या व्हेरी लार्ज टेलिस्कोपसह अनेक दुर्बिणींनी हा सुपरमॅसिव्ह BlackHole शोधला आहे. या सुपरमॅसिव्ह ब्लॅकहोलला J0410−0139 असे नाव देण्यात आले आहे. J0410−0139 हा ब्लॅकहोल पृथ्वीपासून 12.9 अब्ज प्रकाशवर्षे दूर आहे. संशोधकांना सापडलेला हा आतापर्यंत सापडलेले सर्वात जुना आणि सर्वात दूर असलेला ब्लॅकहोल आहे.
अशा प्रकारचे सुपरमॅसिव्ह ब्लॅक होल हे क्वासार म्हणून ओळखले जातात. त्यांच्या ऍक्रिशन डिस्क इतक्या शक्तीशाली असतात की तापमान शेकडो हजारो अंशांपर्यंत पोहोचते. यांच्यातून तीव्र क्षमतेचे एनर्जी बीम अर्थात इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन उत्सर्जित होतात. क्वासारचे प्रखर चुंबकीय क्षेत्र या ऊर्जेचे दोन जेटमध्ये रूपांतर करतात, जे ॲक्रिशन डिस्कमधून आकाशगंगेच्या पलीकडे उत्सर्जित होतात. J0410−0139 या ब्लॅकहोलने पृथ्वीला टार्गेट केले आहे. हा ब्लॅकहोल पृथ्वीच्या दिसने एनर्जी बीम पाठवत आहे. एवढ्या दुरुन येणारे हे एनर्जी बीम पाहून संशोधकांना देखील मोठा धक्का बसला आहे.
आतापर्यंत सुमारे 3,000 ब्लॅकहोल सापडले आहेत. J0410−0139 हा सर्वात दूरचा आणि अत्यंत दुर्मिळ ब्लॅकहोल आहे. यापूर्वी 2020 मध्ये शोधण्यात आलेला PSO J0309+27हा ब्लॅकहोल 12.8 अब्ज प्रकाश-वर्षे दूर होता. हा नवा ब्लॅकहोल त्याच्यापेक्षा 100 दशलक्ष वर्षे जुना आहे. विश्वाच्या सुरुवातीच्या टप्प्यात सुपरमॅसिव्ह ब्लॅकबोल कसे विकसीत झाले याची रहस्य उलगडण्यास हे नवे संशोधन निश्चित मार्गदर्शक ठरेल असे संशोधकांचे म्हणणे आहे.