Paatal Lok 2 : जियो नेहमीच त्यांच्या ग्राहकांना काही नवीन ऑफर देताना दिसतात. जर तुम्हाला वेब सीरिज पाहायला आवडते. तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. जियोनं 17 जानेवारी म्हणजेच आज प्रदर्शित झालेल्या 'पाताल लोक सीजन 2' या सीरिजला फ्रीमध्ये पाहण्याची संधी दिली आहे. जियोनं एक खास रिचार्ज प्लॅनसोबत तुम्ही या वेब सीरिजला कोणत्याही प्रकारे अतिरिक्त शुल्क न देता असं करू शकतात. या मोठ्या ऑफरमुळे अनेक मोबाईल वापरकरत्यांची एक मोठी चिंता दूर केली आहे. वेब सीरिजला फुकटात पाहण्याशिवाय, जियोचा रिचार्ज प्लॅनमध्ये मोठी व्हॅलिडिटी दिली आहे. अनलिमिटेड फ्री कॉलिंग आणि डेटा देखील मिळणार आहे. तुम्ही एकाच रिचार्ज प्लॅनमध्ये अनेक ऑफर्स मिळवू शकतात.
जियोचे अनेक रिचार्ज प्लॅन्समध्ये अनेक OTT अॅप्सचं फ्री सब्सक्रिप्शन मिळालं आहे. 'पाताल लोक 2' आज Amazon Prime Video वर प्रदर्शित झाली आहे. या वेब सीरिजला पाहण्यासाठी तुम्हाला Amazon Prime Video चं सब्सक्रिप्शन घ्यावं लागेल. पण जर तुम्हाला वेगळं सब्सक्रिप्शन घ्यायचं नसेल तर तुम्ही जियोच्या एक खास रिचार्ज प्लॅनसोबत 'पाताल लोक 2' ला फ्रीमध्ये पाहू शकता.
जियोनं 1029 रुपयांचा एक चांगला प्लॅन आणला आहे. या प्लॅनमध्ये तुम्हाला 84 दिवसांची व्हॅलिडिटी मिळणार. या प्लॅनमध्ये तुम्ही कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड फ्री कॉल करु शकतात. त्याशिवाय तुम्ही रोज 100 फ्री एसएमएस देखील मिळतील.
या प्लॅनमध्ये तुम्हाला एकूण 168GB हाय-स्पीड डेटा मिळणार. तुम्ही रोज 2GB हाय-स्पीड डेटा वापरु शकतात. या प्लॅनमध्ये Amazon Prime Lite चं 84 दिवसांचं सब्सक्रिप्शन देखील मिळू शकतं. त्यामुळे 'पाताल लोक 2' ला फ्रीमध्ये पाहू शकतात. या प्लॅनचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे तुम्हाला फ्री कॉलिंग आणि OTT सब्सक्रिप्शन दोन्ही एकाच प्लॅनमध्ये मिळतात. त्यामुळे आता पातल लोक पाहण्यासाठी उत्सुक असणाऱ्यांना दुसरा भाग हा फ्रीमध्ये पाहण्याची चांगली संधी मिळाली आहे.