जया-रेखा नव्हे, अमिताभ यांचा पहिल्यांदा 'या' मुलीवर जडला होता जीव; 3 वर्षे चाललं अफेअर

Amitabh Bachchan Unknown Facts: बहुतांश जणांना वाटतं की रेखा हे अमिताभ यांचं पहिलं प्रेम होतं. यानंतर जया भादुरी यांच्याजवळ ते आले आणि त्यांनी लग्न केलं. 

Pravin Dabholkar | Updated: Oct 10, 2024, 05:54 PM IST
जया-रेखा नव्हे, अमिताभ यांचा पहिल्यांदा 'या' मुलीवर जडला होता जीव; 3 वर्षे चाललं अफेअर title=
अमिताभ यांचं पहिलं प्रेम

Amitabh Bachchan Unknown Facts: बिग बी अमिताभ बच्चन यांच्या लव्ह लाइफची चर्चा होते तेव्हा रेखा यांचं नाव सर्वात आधी घेत जातं. पण असं नाहीय. बिग बींच्या आयुष्यातील पहिलं प्रेम दुसरंच कोणीतरी होतं.जिच्यावर बिग बींचा जीव जडला होता. बॉलिवूडचे शहेनशाह बिग बी यांचा आज 81 वा वाढदिवस आहे. 11 ऑक्टोबर 1942 रोजी इलाहबाद म्हणजेच आताच्या प्रयागराजमध्ये त्यांचा जन्म झाला. त्यांच्या लव्ह स्टोरीबद्दल जाणून घेऊया. 

रेखा नव्हती पहिलं प्रेम 

बहुतांश जणांना वाटतं की रेखा हे अमिताभ यांचं पहिलं प्रेम होतं. यानंतर जया भादुरी यांच्याजवळ ते आले आणि त्यांनी लग्न केलं. रेखा आणि जया यांच्या आधी अमिताभ यांच्या आयुष्यात एक मुलगी आली होती. ती महाराष्ट्रीयन मुलगी होती. जिच्यावर त्यांचा जीव जडला होता. अमिताभ बच्चन यांचे मित्र दिनेश कुमार यांनी याचा खुलासा केला होता. थिएटर नाटकादरम्यान दोघांची ओळख झाली होती. हे नातं साधारण 3 वर्षे चाललं. एका रिपोर्टमध्ये यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे. 

कोलकातामध्ये फुटले प्रेमाचे धुमारे 

ही गोष्ट त्यावेळची आहे, जेव्हा अमिताभ बच्चन 'शहेनशाह' नव्हते. त्यावेळी ते कोलकातामध्ये नोकरी करायचे. त्याच कंपनीत एक महाराष्ट्रीय तरुणी कामाला होती. चंदा असे त्या मुलीचे नाव असल्याचे म्हटले जाते. बिग बींना त्या मुलीशी लग्न करायचे होते. पण गोष्ट पुढे गेली नाही. अमिताभ यांनी कोलकात्यातील नोकरी सोडली आणि ते मुंबईला आले. त्या मुलीने बंगाली सिनेमातील अभिनेत्याशी लग्न केल्याची माहिती रिपोर्ट्समधून पुढे आली आहे. 

जया यांच्यासोबत कशी झाली ओळख?

अमिताभ बच्चन आणि जया यांची पहिली भेट 1970 च्या दरम्यान झाली. त्यावेळी जया यांनी अमिताभ यांना पुणे फिल्म इंस्टिट्यूटमध्ये पाहिले होते. तोपर्यंत जया या आधीच मोठ्या स्टार बनल्या होत्या. खूप सडपातळ असल्याने अमिताभ यांना पुणे फिल्म इंस्टिट्यूचे मित्र-मैत्रीणी छडी म्हणून हाक मारायचे. पण जया त्या मित्र मैत्रिणींशी भांडायच्या. बिग बींनी जया यांना एका मॅगझिन कव्हरवर पाहिलं होतं. त्यावेळीच ते जया यांच्या प्रेमात पडले होते.यानंतर दोघेही एकमेकांना आवडू लागले. 'जंजीर' सिनेमादरम्यान दोघांच्यातील जवळीक आणखी वाढली. 

लगेच उरकलं लग्न 

प्रकाश मेहरा यांच्या 'जंजीर'मध्ये अमिताभ बच्चन अॅंग्री यंग मॅनच्या भूमिकेत दिसले. लोकांना त्यांची ही भूमिका खूप आवडली. सिनेमाच्या यशाचे सेलिब्रेशन लंडनमध्ये करण्याचा प्लान आखला गेला. ही गोष्ट अमिताभ यांचे वडील हरिवंश राय बच्चन यांना समजली. त्यावेळी त्यांनी अमिताभ यांच्यासोबत लंडनला जाणाऱ्यांची यादी मागवून घेतली. या यादीत जया बहादुरी यांचं नाव त्यांनी पाहिलं. जर तूला लंडनला जायचं असेल तर आधी जयाशी लग्न कर, असे हरिवंश राय यांनी अमिताभ यांना सांगितले. अमिताभदेखील या गोष्टीसाठी राजी झाले. दुसऱ्यादिवशीच अमिताभ आणि जया यांचा विवाह झाला. यानंतर दोघेही लंडनला गेले.