कोण जिंकणार महाराष्ट्र केसरी? चार कुस्तीपटूंनमध्ये चुरस, आज होणार अंतिम लढत

Maharahstra Kesari 2025 : अहिल्यानगर येथील स्व. बलभीम अण्णा जगताप क्रीडा नगरीत मागील चार दिवसांपासून महाराष्ट्र केसरी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

पुजा पवार | Updated: Feb 2, 2025, 03:35 PM IST
कोण जिंकणार महाराष्ट्र केसरी? चार कुस्तीपटूंनमध्ये चुरस, आज होणार अंतिम लढत  title=
(Photo Credit : Social Media)

Maharahstra Kesari : महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ यांच्या मान्यतेने आणि अहिल्यानगर जिल्हा कुस्तीगीर संघ, आमदार संग्रामभैय्या जगताप सोशल फाऊंडेशनच्यावतीने अहिल्यानगर येथील स्व. बलभीम अण्णा जगताप क्रीडा नगरीत मागील चार दिवसांपासून महाराष्ट्र केसरी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. यात अनेक जिल्ह्यांतील विविध तालमीत प्रशिक्षण घेतलेले 860 मल्लांनी यात नोंदणी केली होती. आज या स्पर्धेचा अंतिम सामना पार पडणार आहे. 

अहिल्यानगर येथे होणाऱ्या महाराष्ट्र केसरी 2025 (Maharashtra Kesari) च्या गादी विभागातील अंतिम लढत नांदेडचा डबल महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे विरुद्ध पुणे जिल्ह्याचा पृथ्वीराज मोहोळ यांच्यात होईल. तर माती विभागातील अंतिम लढत सोलापूर जिल्ह्याच्या महेंद्र गायकवाड विरुद्ध परभणीच्या साकेत यादव यांच्यात पार पडेल. यापैकी कोणता कुस्तीपटू महाराष्ट्र केसरीचा खिताब पटकावतो हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. 

हेही वाचा : कॉमेंटेटर क्रिकेटपटूंपेक्षा कमी नाही! कमाई ऐकून व्हाल थक्क, जगतात लॅव्हिश लाइफस्टाईल

 

उपमुख्यमंत्री अजित पवार राहणार उपस्थित : 

महाराष्ट्र केसरी 2025 या स्पर्धेच्या अंतिम सामन्याला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अन्य मंत्री देखील उपस्थिती राहणार आहेत. तर उपांत्यफेरीच्या लढती हे महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या उपस्थितीत पार पडतील. असून डोळ्याचे पारणे फेडणारे हे सामने होत असल्याची प्रतिक्रिया रुपाली चाकणकर यांनी दिली होती.