ना टायगर, ना कृष्णा, जॅकी श्रॉफ यांच्या मांडीवर बसलेल्या बाळाला ओळखलं का? 26 व्या वर्षी आहे 74 कोटींची मालकीण

जॅकी श्रॉफ यांनी नुकताच त्यांचा 68 वा वाढदिवस साजरा केला. अशातच एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ते एका बाळाला आपल्या मांडीवर घेऊन त्याच्याकडे प्रेमाने पाहत आहेत.

सोनेश्वर पाटील | Updated: Feb 2, 2025, 01:23 PM IST
ना टायगर, ना कृष्णा, जॅकी श्रॉफ यांच्या मांडीवर बसलेल्या बाळाला ओळखलं का? 26 व्या वर्षी आहे 74 कोटींची मालकीण title=

Jackie Shroff : नुकताच जॅकी श्रॉफ यांनी त्यांचा 68 वा वाढदिवस साजरा केला आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी त्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तर काही कलाकारांनी त्यांच्यासोबतचे फोटोही शेअर केले. मात्र, सध्या सोशल मीडियावर एका फोटोने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. ज्यामध्ये जॅकी श्रॉफ हे तरुण दिसत आहेत. त्यासोबतच त्यांच्या हातात एक बाळ देखील दिसत आहे. 

दरम्यान, त्यांच्या मांडीवर दिसणारे हे बाळ ना जॅकी श्रॉफ यांची मुलगा आहे ना टायगर श्रॉफ. तर त्यांची मुलगी कृष्णा श्रॉफही नाही. त्यांच्या मांडीवरील बाळ हे आज बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रींपैकी एक आहे. या अभिनेत्रीने सुपरहिट चित्रपटातून पदार्पण केलं आहे. 

फोटोमध्ये दिसणारी ही अभिनेत्री कोण? 

या अभिनेत्रीला सर्वोत्कृष्ट पदार्पण अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला आहे. या अभिनेत्रीने डेब्यू केलेल्या चित्रपटात दोन अभिनेत्री होत्या आणि टायगर श्रॉफ हा मुख्य भूमिकेत होता. या चित्रपटात आदित्य सील देखील होता. आता तुम्हाला आम्ही कोणत्या अभिनेत्रीबद्दल बोलत आहोत याचा अंदाज तुम्हाला आलाच असेल. जर नसेल तर आम्ही तुम्हाला सांगतो की ही अभिनेत्री दुसरी कोणी नसून अनन्या पांडे आहे.

अनन्या पांडेने टायगर श्रॉफच्या'स्टूडेंट ऑफ द ईयर 2' या चित्रपटातून तारा सुतारियासोबत पदार्पण केले होते. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट हिट ठरला होता. या चित्रपटासाठी अनन्याला सर्वोत्कृष्ट पदार्पण अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. तेव्हापासून अनन्याने मागे वळून पाहिलेच नाही. सध्या ती 26 वर्षांची असून ती 74 कोटींची मालकीण आहे. अनन्याने स्वतः जॅकी श्रॉफसोबतचा हा फोटो शेअर केला आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

अनन्या पांडे जॅकी श्रॉफ यांच्या मांडीवर दिसत आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये अनन्याने लिहिले की, 'आम्ही खूप पुढे आलो आहोत'. याआधी अनन्या पांडे आणि जॅकी श्रॉफ एका जाहिरातीत एकत्र आले होते. यामध्ये दोघेही एकमेकांची नक्कल करताना दिसत होते.