आमीर खानचा लेक आणि श्रीदेवीच्या मुलीचा भन्नाट चित्रपट; 'लवयापा'च्या ट्रेलरने वाढवली उत्कंठा

ओटीटीवर 'महाराजा' चित्रपटाच्या माध्यमातून पदार्पण करणारा जुनैद खान 'लवयापा' चित्रपटात प्रेक्षकांना आश्चर्यचकित करणार आहे. या चित्रपटात त्याची भूमिका त्याच्या करिअरचा महत्त्वाचा टर्निंग पॉईंट ठरू शकते. चित्रपटाची कथा अतिशय सुंदर विषयावर आधारित असून त्यात Gen Z च्या जीवनशैली आणि नातेसंबंधांना आकर्षकपणे दाखवण्यात आले आहे. खुशी आणि जुनैद या दोघांचीही भूमिका प्रेक्षकांसाठी एकदम उत्कृष्ठ ठरली आहे.  

Intern | Updated: Jan 11, 2025, 05:33 PM IST
आमीर खानचा लेक आणि श्रीदेवीच्या मुलीचा भन्नाट चित्रपट; 'लवयापा'च्या ट्रेलरने वाढवली उत्कंठा title=

आमिर खानचा मुलगा जुनैद आणि श्रीदेवी, बोनी कपूर यांची मुलगी खुशी 'लवयापा' चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पदार्पण करत आहेत. ट्रेलर रिलीजपूर्वी गाण्याची रिलीज होऊन काही चाहत्यांना निराशा झाली होती.  

ट्रेलरमध्ये काय खास आहे?  
ट्रेलरने प्रेक्षकांची उत्सुकता वाढवली आहे. हे चित्रपट Gen Z साठी योग्य आहे आणि गाण्याच्या अपयशानंतरही ट्रेलरने चित्रपटाबद्दल अधिक आकर्षण निर्माण केलं आहे. पुढे काय होईल याची अनामिक तणावाची भावना ट्रेलरमध्ये जाणवते. प्रेक्षकांच्या मनात अशी उत्कंठा निर्माण करणं कोणत्याही चित्रपटासाठी एक मोठं यश आहे, आणि लवयापा या बाबतीत तो यशस्वी दिसत आहे.

ट्रेलरची सुरुवात:  
ट्रेलरची सुरुवात अशी होते जिथे जुनैद खान म्हणजेच गौरव आणि खुशी कपूर म्हणजेच बानी, जे स्वतःला एक परफेक्ट कपल मानतात, त्यांच्या पालकांसमोर लग्नाबद्दल बोलतात. बानीच्या वडिलांची भूमिका करणारा आशुतोष राणा एक गेम खेळतो तेव्हा हे सगळं प्रकरण उलगडतं.

गौरव आणि बानीचं खरं लग्न होणार का?
आशुतोष राणा एक अट ठेवतात की दोघांनी एक दिवस फोन एकमेकांसोबत एक्सचेंज केले पाहिजे आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी लग्नाची निर्णय घेतला जाईल. या एका दिवसात त्यांच्या वैयक्तिक आयुष्याची अनेक गुपितं उघडतात. त्यांच्या भूतकाळातील नात्यांचा सगळा गोंधळ ट्रेलरमध्ये दाखवला आहे. आता त्यांचे आदर्श लग्नाचे स्वप्न फसते का, की ते यशस्वी होतात, हे चित्रपट पाहिल्यानंतरच समजेल.  

चित्रपट कधी प्रदर्शित होणार?  
'लवयापा' हा 2022 मध्ये प्रदर्शित झालेल्या तमिळ चित्रपट 'लव्ह टुडे' चा रिमेक आहे. या चित्रपटात किकू शारदाही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. व्हॅलेंटाईन वीकेंडच्या पहिल्या दिवशी म्हणजेच 7 फेब्रुवारीला हा चित्रपट प्रदर्शित होईल. या चित्रपटाचं दिग्दर्शन अद्वैत चंदन यांनी केलं आहे. महाराजा नंतर जुनैद खानला रोमँटिक कॉमेडी भूमिकेत पाहणं निश्चितच आश्चर्यकारक ठरतं.