सुनीताशी लग्न होऊनही ‘या’ अभिनेत्रीच्या प्रेमात होता गोविंदा वेडा, ‘कुंडलीत दुसरं लग्न...’

नीलम कोठारी, रवीना टंडन, राणी मुखर्जी आणि दिव्या भारती ही अशी नावे आहेत ज्यांच्याशी गोविंदाचे नाव त्या काळात जोडलं गेलं होतं. त्याने ते कधीच उघडपणे स्वीकारले नाही, पण एका अभिनेत्रीबद्दल गोविंदाने प्रेमाची कबुली दिली होती. 

नेहा चौधरी | Updated: Feb 12, 2025, 06:33 PM IST
सुनीताशी लग्न होऊनही ‘या’ अभिनेत्रीच्या प्रेमात होता गोविंदा वेडा, ‘कुंडलीत दुसरं लग्न...’ title=

गोविंदा हा 90 च्या दशकातील सुपरस्टार होता, ज्याने केवळ त्याच्या अभिनयानेच नव्हे तर त्याच्या नृत्यानेही चाहत्यांना वेड लावलं होतं. 'हिरो नंबर 1', 'कुली नंबर 1', 'पार्टनर', 'हद कर दी आपने' आणि 'राजा बाबू' यांसारख्या चित्रपटांमध्ये त्याचा अभिनयाने त्यांनी प्रेक्षकांची मने जिंकली होती. अभिनेता आणि त्याची पत्नी सुनीता आहुजा यांची प्रेम कहाणी जगजाहीर आहे. पण चित्रपटसृष्टी म्हटलं की, अभिनेता आणि अभिनेत्रीच नाव जोडलं जातं असतं. त्याकाळात टॉपच्या अभिनेत्री नीलम कोठारी, रवीना टंडन, राणी मुखर्जी आणि दिव्या भारती यांच्यासबोत त्याचे नाव जोडलं गेलं होतं. पण या नात्याबद्दल तो कधी खुलेपणाने बोलला नाही. पण एका अभिनेत्रीबद्दलच त्याचं प्रेम त्याने लग्नानंतरही कबुल केलं होतं. 

 

नीता गोविंदाच्या अफेअर्समुळे अस्वस्थ होती का?

अलिकडेच दिलेल्या एका मुलाखतीत सुनीता आहुजा यांनी गोविंदाचे नाव इतर स्टार्सशी जोडल्या जाणाऱ्या नावाबद्दल खुलपणाने गप्पा मारल्यात. गेल्या काही वर्षांत लग्नाबद्दलचा त्यांचा दृष्टिकोन कसा बदलला असंही त्या म्हणाल्यात. गोविंदाच्या तरुणपणातील लव्ह अफेयरच्या अफवांचा त्याच्यावर प्रभाव पडला का असं विचारण्यात आलं? या प्रश्नाला उत्तर देताना सुनीता म्हणाल्यात की, त्या काळी फारसा फरक पडला नाही. कारण खात्री होती गोविंदाच्या व्यस्त वेळापत्रकामुळे तो जमिनीशी जोडला राहिल. जर अशा अफवा आता समोर आल्या तर आता मला अस्वस्थ करू शकतात, असे त्यांनी कबूल केलं.

 'जे व्हायचे ते होईलच' 

'स्टारडस्ट'ला दिलेल्या एका जुन्या मुलाखतीत, गोविंदाने सुनीतासोबतच्या लग्नादरम्यान दिव्या भारतीवरील त्याच्या प्रेमाबद्दल कबुली दिली होती. त्यानंतर अभिनेत्याने खुलासा केला होता की तो दिव्याकडे तो आकर्षित झाला होता. तो म्हणाला होता, 'मला नशिबावर खूप विश्वास आहे.' जे घडायचे आहे ते होईलच.

गोविंदा यावेळी पुढे म्हणाला की, 'हो, मला जुही चावला खूप आवडते. मलाही दिव्या भारतीही आवडते. दिव्या खूप बोल्ड मुलगी आहे. कोणत्याही पुरूषाला तिच्याकडे दुर्लक्ष करणे खूप कठीण आहे. मला माहित आहे की सुनीता या सगळ्यामुळे खूप नाराज होईल पण तिला हे माहित असायला हवे की मी अजूनही दिव्याच्या सौंदर्याकडे माझे लक्ष हटवू शकत नाही.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Priya (@bollywoodtriviapc)

गोविंदाने त्याच्या दुसऱ्या लग्नाबद्दल काय म्हटले?

गोविंदाने त्याच्या दुसऱ्या लग्नाबद्दलही या मुलाखतीत सांगितलं होतं. गोविंदाने दुसरं लग्न करण्याची शक्यता नाकारली नाही. त्याच्या कुंडलीत दुसरं लग्न होण्याची शक्यता होती, असं गोविंदा म्हणाला, 'उद्या, कोण जाणे, मी पुन्हा लग्न करू शकतो किंवा कदाचित मी ज्या मुलीसोबत आहे तिच्याशीच लग्न करू शकतो.' त्याने तिला स्पष्ट शब्दात सांगितले होते की सुनीताने यासाठी तयार राहावे. तरच मला मोकळे वाटेल आणि माझ्या कुंडलीत दुसरं लग्न होण्याची शक्यता आहे.

11 मार्च 1987 पासून रिलेशनशिपमध्ये असलेल्या सुनीता आणि गोविंदाच्या लव्ह स्टोरी आजही इंडस्ट्रीमध्ये प्रसिद्ध आहेत. या दोघांना, मुलगी टीना आहुजा आणि मुलगा यशवर्धन आहेत. आयुष्यातील चढ-उतारांमध्ये सुनीता आणि गोविंदा एकमेकांच्या पाठीशी उभे राहताना दिसून आले आहेत.