Sunita Williams Return : 200 दिवसांची प्रतीक्षा संपली! अखेर 'या' तारखेला पृथ्वीवर परतणार सुनीता विल्यम्स!

NASA चा निर्णय चुकला ECf 8 दिवसांसाठी स्पेस स्टेशनवर गेलेल्या सुनीता विल्यम्स 8 महिन्यांसाठी अडकल्या. अखेर 200 दिवसानंतर  सुनीता विल्यम्स पृथ्वीवर परतणार आहेत. 

वनिता कांबळे | Updated: Feb 12, 2025, 05:06 PM IST
Sunita Williams Return : 200 दिवसांची प्रतीक्षा संपली! अखेर 'या' तारखेला पृथ्वीवर परतणार सुनीता विल्यम्स! title=

Sunita Williams Boeing Starliner Spacecraft : भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स या तिस-यांदा गेल्या अंतराळ मोहिमेवर गेल्या मोठ्या संकटात सापडल्या.  फक्त आठ दिवसांसाठी अंतराळात गेलेल्या  नासाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स  या तब्बल आठ महिन्यांसाठी अंतराळात अर्थात स्पेस स्टेशनवर अडकल्या. जवळपास 200 दिवसांची प्रतीक्षा संपली आहे.  सुनीता विल्यम्स यांना पुन्हा पृथ्वीवर परत आणण्याची तारीख जवळपास निश्चित झाली. यासाठी NASA ने खास प्लान बनवला आहे. 

5 जून 2023 रोजी भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स यांनी आणखी एक नवा इतिहास रचला. बोईंगच्या स्टारलाईनर स्पेसक्राफ्टने पृथ्वीवरून उड्डाण केले. या स्पेस क्राफ्टमधूनच  सुनीता आणि त्यांचे सहकारी बुच विल्मोर हे स्पेसटेशनवर गेले. प्रक्षेपणानंतर 26 तासांनी गुरुवारी रात्री 11 वाजता बोईंगच्या स्टारलाईनर स्पेसक्राफ्ट स्पेश स्टेशनवर पोहचल्या. आठ दिवसांची मोहिम फत्ते करुन मुख्य प्लान नुसार सुनीता विल्यम्स आणि बुश विल्मोर  15 जूनला पृथ्वीवर परतणार होते.   22 जूनला त्यांना पृथ्वीवर आणण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. यानंतर 9 जुलैला देखील स्पेसक्राफ्ट डॉक करण्याचा प्रयत्न करण्यात आला.  सर्व प्रयत्न अपयशी ठरले. 

सुनिता विलियम्स आणि विल्मोर फेब्रुवारी 2025 मध्ये एलॉन मस्क यांच्या स्पेस एक्समधील क्रू-9 च्या यानातून परतणार असल्याचे नासाने जाहीर केले होते. स्पेस एक्समधील क्रू-9 सध्या स्पेस स्टेशनला जोडललेले आहे. मात्र, यात तांत्रिक त्रुटी असल्याकारणाने हे स्पेस एक्स क्रू-9 हे यान रिकामे पृथ्वीवर आणले जाणर आहे. यातून कोणत्याही अंतराळवीराला आणले जाणार नाही. 

नविन अपडेटनुसार सुनीता विल्यम्स आणि बुश विल्मोर यांना  स्पेस एक्समधील क्रू- 10 मधून पृथ्वीवर परत आणले जाणार आहे. नासाने स्पेस एक्समधील क्रू- 10 मोहिमेची तयारी सुरु केली आहे. क्रू 10 मोहिमेत नासाच्या अंतराळवीर अ‍ॅन मॅक्क्लेन आणि निकोल आयर्स, जपान एरोस्पेस एक्सप्लोरेशन एजन्सीचे अंतराळवीर ताकुया ओनिशी आणि रोसकॉसमॉसचे अंतराळवीर किरील पेस्कोव्ह यांना स्पेस स्टेशनवर नेले जाणार आहे. याच स्पेस एक्स क्रू- 10 मधून  सुनीता विल्यम्स आणि बुश विल्मोर यांना  पृथ्वीवर आणले जाणार आहे.  12 मार्च 2025 रोजी स्पेस एक्स क्रू- 10 ये यान स्पेस स्टेशनच्या दिशेने झेपावणार आहे.