Fact Check: फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी जाणूनबुजून पंतप्रधान मोदींशी हात मिळवला नाही? जाणून घ्या सत्य

Paris AI Summit: मंगळवारी, मोदी आणि मॅक्रॉन यांनी एआय ऍक्शन समिटला उपस्थिती दाखवली. मोदींचा हा सहावा फ्रान्स दौरा असून यामुळे संबंध अधिक दृढ होत आहेत. या समिटचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.  

तेजश्री गायकवाड | Updated: Feb 12, 2025, 04:56 PM IST
Fact Check: फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी जाणूनबुजून पंतप्रधान मोदींशी हात मिळवला नाही? जाणून घ्या सत्य   title=

PM Modi Viral Video: पंतप्रधान नरेंद्र मोदी फ्रान्सच्या दोन दिवसीय दौऱ्यावर आहेत, जिथे ते उच्चस्तरीय बैठकी आणि कार्यक्रमांमध्ये व्यस्त आहेत. बुधवारी, ते फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासमवेत भारताच्या नवीन वाणिज्य दूतावासाचे उद्घाटन करण्यासाठी मार्सेले येथे आले आहेत. महायुद्धात प्राणांची आहुती देणाऱ्या भारतीय सैनिकांना श्रद्धांजली वाहण्यासाठी माझारगेस वॉर सेमेटरीला भेट देण्यासह अनेक कामाची यादी पंतप्रधानकडे आहे. ते आंतरराष्ट्रीय थर्मोन्यूक्लियर प्रायोगिक अणुभट्टी (ITER) प्रकल्पालाही भेट देणार आहेत. याच दरम्यान नरेंद्र मोदींचा एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आहे. 

मंगळवारी, मोदी आणि मॅक्रॉन यांनी एआय ऍक्शन समिटमध्ये आणि 14 व्या भारत-फ्रान्स सीईओ फोरममध्ये भाग घेतला. यामध्ये आर्थिक आणि तांत्रिक सहकार्यावर प्रकाश टाकला गेला. मोदींचा हा सहावा फ्रान्स दौरा असून यामुळे संबंध अधिक दृढ होत आहेत.

हे ही वाचा: 400गाड्यांचा मालक, अब्जावतीची संपत्ती! 'हा' आहे देशातील सर्वात श्रीमंत न्हावी; त्याच्यापुढे अब्जाधीशांची संपत्ती पडेल फिकी

 

नक्की काय झालं?

दोन्ही नेते भारत-फ्रान्स संबंधांना नवीन उंचीवर घेऊन जाणारी यशस्वी द्विपक्षीय बैठक करतात. दरम्यान सोशल मीडिया युजर्सच्या एका वर्गाने असा दावा केला आहे की फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रॉन यांनी एआय समिट दरम्यान पंतप्रधान मोदींशी हात मिळवला नाही. शिवाय त्यांनी इतर जागतिक नेत्यांशी हस्तांदोलन केले तेव्हा त्यांनी दुर्लक्ष केले किंवा त्यांचा अपमान केला. याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून अनेकांनी तो व्हिडीओ शेअर केला आहे.

 

हे ही वाचा: पृथ्वीखाली काहीतरी हलत आहे? दिवसाच्या 24 तासातील काही तास कमी होणार? जाणून घ्या शास्त्रज्ञांचा अभ्यास

 

खरंच असे झाले होते का? 

पंरतू, व्हायरल जाल्लें हा व्हिडीओ एका मोठ्या व्हिडीओचा एक छोटा भाग आहे ज्यामध्ये मॅक्रॉन आणि पंतप्रधान मोदींसोबत कार्यक्रमस्थळी प्रवेश करताना दिसत आहेत. मॅक्रॉन आणि मोदी यांची पहिली भेट त्या हॉलच्या बाहेरच झाली होती. तेव्हा या दोन्ही नेत्यांनी हात मिळवले होते.  ज्या ठिकाणी फ्रान्सच्या राष्ट्रपतींनी त्यांच्या भारतीय समकक्षांचे स्वागत केले त्या ठिकाणाच्या बाहेरच झाली. तेव्हा दोन्ही नेत्यांनी हस्तांदोलन केले, अभिवादन केले, गाडी मिठीही मारली. त्या नंतर त्यांनी कार्यक्रमाच्या हॉलमध्ये प्रवेश केला जेथे इतर जागतिक नेते बसले होते.

हे ही वाचा: बॉडी वॉश ते गीझर, मुंबईच्या रस्त्यावर महिलांसाठी धावतेय अनोखी बस; पंचतारांकित हॉटेलपेक्षा नाही कमी

 

दावा खोटा

त्यामुळे व्हायरल व्हिडीओमध्ये करण्यात येत असलेला दावा खोटा आहे. दोन्ही नेत्यांनी एकमेकांशी हस्तांदोलन केले आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी जाणूनबुजून पंतप्रधान मोदींना दुर्लक्ष केले नाही. पंतप्रधान आज संध्याकाळी त्यांच्या दोन देशांच्या दौऱ्याचा एक भाग म्हणून अमेरिकेला जाणार आहेत.