ना सोडून जाणार, ना म्हातारी होणार! आयुष्यभर साथ देणारी AI बायको, किंमत फक्त…

Trending News: काळ बदलत गेला तसा तंत्रज्ञानदेखील बदलत चाललं आहे. आता मात्र सगळ्यांना हादरवून टाकणारी बातमी समोर येत आहे. 

मानसी क्षीरसागर | Updated: Jan 13, 2025, 12:54 PM IST
ना सोडून जाणार, ना म्हातारी होणार! आयुष्यभर साथ देणारी AI बायको, किंमत फक्त… title=
AriaThe Rs 1.5 Crore AI Robot Girlfriend tackle the male loneliness epidemic

Trending News: काळ जसा बदलत गेला तर टेक्नलॉजीत आणि नात्यातही बदल होत गेला. हल्ली तरुणाईला डेटवर जाणे, गर्लफ्रेंडसोबत फिरणे ही हौस वाटते. महाविद्यालयात जाणाऱ्या तरुण-तरुणीदेखील बॉयफ्रेंड आणि गर्लफ्रेंडसोबत फिरत असतात. मात्र नातं पोकळ असल्याने हल्ली ब्रेकअपचे प्रकारदेखील वाढले आहेत. पण आता हा ब्रेकपअपचा हा त्रासदेखील वाढणार आहे. एआय कंपॅनियन टूल्सनंतर, एआय रोबोट ‘गर्लफ्रेंड’देखील तयार करण्यात आली आहे. त्याची वैशिष्ट्येदेखील मानवासारखी आहेत. ‘आरिया’ ही रोबोट ‘गर्लफ्रेंड’ विशेषतः सहवास आणि जवळीकतेसाठी डिझाइन केलेली आहे. 

‘आरिया’साठी किती खर्च करावा लागेल?

कंपनीने आरियाच्या तीन आवृत्त्या लाँच केल्या आहेत. एका प्रकारात, फक्त मानेचा वरचा भाग उपलब्ध असेल. यासाठी १०,००० अमेरिकन डॉलर्स म्हणजेच अंदाजे ८ लाख ६० हजार रुपये खर्च करावे लागतील. दुसरे मॉड्युलर आवृत्ती आहे. त्याची किंमत १ कोटी २९ लाख रुपये आहे. तर तिसरा पर्याय पूर्ण आकाराचे मॉडेल आहे, ज्याची किंमत सुमारे १ कोटी ५० लाख रुपये आहे.

एकाकीपणा दूर करणे, एक रोमँटिक साथीदार म्हणून आरियाची निर्माती करण्यात आल्याचे रिअलबोटिक्सचे सीईओ अँड्र्यू किगुएल यांनी दिली आहे. आरियाची वैशिष्ट्य म्हणजे, आरियाच्या संपूर्ण शरीरात १७ मोटर्स बसवण्यात आल्या आहेत, ज्यामुळे तिला मान फिरवण्यास आणि इतर हालचाली करण्यास मदत होते. आरियाचा चेहरा, केसांचा रंग आणि केशरचनादेखील कस्टमाइज करता येते. रोबोट्समध्ये आर.एफ.आय.डी. टॅग्ज जोडलेले आहेत, ज्यामुळे तिने कोणता चेहरा धारण केला आहे याचा अंदाज लावू शकते. या आधारावर ती तिच्या हालचाली आणि व्यक्तिमत्त्वात बदल करते.

अमेरिकन कंपनी रिअलबोटिक्सने यावर्षी हा एआय रोबोट लास वेगासमधील २०२५च्या कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक्स शोमध्ये लाँच केला आहे. ही कंपनी जिवंत माणसांसारखी सामाजिक बुद्धिमत्ता आणि वैशिष्ट्ये असलेले रोबोट तयार करते.