यूकेमधील एक व्यक्ती महिलेवर बलात्कार आणि हत्या केल्याबद्दल मोठ्या तुरुंगवासाची शिक्षा भोगत आहे. त्याने पार्कमध्ये बेंचवर बसलेल्या महिलेवर हल्ला केला होता. मोहम्मद आयडो (35) पश्चिम लंडनमधील साउथॉल पार्कमध्ये फिरत असताना सीसीटीव्हीमध्ये कैद झाला होता. तो एका टार्गेटच्या. यादरम्यान तीन मुलांची आई असलेल्या 37 वर्षीय नताली शॉटरवर त्याची नजर पडली होती. Independent च्या वृत्तानुरसार नाईट आऊटनंतर ती तिथेच झोपी गेली होती.
सीसीटीव्हीत हा धक्कादायक घटनाक्रम कैद झाला होता. सीसीटीव्हीत आरोपी मोहम्मद आयडो महिलेवर 15 मिनिटांत अनेकदा वार करुन तिला बेशुद्ध करताना दिसत आहे. महिला बेशुद्ध असताना त्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.
नतालीची आई, डॉ. कॅस शॉटर वीटमॅन, यांनी महिलांवरील भयानक हिंसाचाराचे निराकरण करण्यासाठी तातडीची कारवाई करण्याचं आवाहन केलं आहे. अनेक लोक मोकळेपणाने फिरू शकत नाहीत किंवा सार्वजनिक ठिकाणी सुरक्षित वाटत नाही यावर त्यांनी जोर दिला आहे.
"आपण कसे वागतो याबद्दल आपले विचार बदलले पाहिजेत. असे अनेक लोक आहेत जे अत्यंत विचलित आणि भयानक मार्गाने वागतात आणि त्यांना वाटतं की त्यांना याबद्दल काहीच शिक्षा होणार नाही," असा संताप त्यांनी व्यक्त केला आहे. डॉ. वीटमन यांनी आपल्या मुलीवर बलात्कार होताना पाहणं फारच धक्कादायक होतं हे सांगताना कोणत्याही आईला हे कधीही पहावे लागू नये असं म्हटलं.
मीडिया आउटलेटने दिलेल्या वृत्तानुसार, शुक्रवारी न्यायाधीश रिचर्ड मार्क्स केसी यांनी आयडोला किमान 10 वर्षे आणि आठ महिन्यांच्या जन्मठेपेची शिक्षा सुनावली, . न्यायाधीश म्हणाले की शॉटर असुरक्षित आणि बेशुद्ध असताना तिचा फायदा घेणे दुष्ट आणि पूर्णपणे बेजबाबदार वर्तन होते.
न्यायाधीशांनी नमूद केले की, घशाच्या मागील बाजूस असलेल्या मज्जातंतूंच्या अतिउत्साहामुळे हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू झाल्याची नोंद यापूर्वी कधीही घडली नसली तरी आरोपीने तिच्यासह जे काही केले त्यामुळे गंभीर इजा होण्याचा धोका जास्त होता. फिर्यादी ॲलिसन मॉर्गन केसी यांनी खटल्यादरम्यान सांगितले की शॉटरचा मृत्यू आयडोने तिच्यावर वारंवार बलात्कार केल्यामुळे हृदयविकाराच्या झटक्याने झाला होता.
सीसीटीव्हीमध्ये शॉटर एका वेगळ्या माणसासोबत बेंचवर बसलेली असताना आयडोने पुढे जाऊन त्यांना पाहिलं होतं. "प्रतिवादी तिथे काय करत होता, तो काय करू पाहत होता, मध्यरात्री रस्त्यांवर वर-खाली फिरत होता आणि त्याची उद्दिष्टे काय असावीत याचा विचार करत होता. तो बलात्कारासाठी एका असुरक्षित महिलेला शोधत होता," सुश्री असं मॉर्गन यांनी सांगितलं. त्यानंतर दोषी परतण्यापूर्वी पार्कमधून आपल्या कारमधून निघून गेला होता.
मॉर्गन यांनी सांगितलं की, आरोपी पीडितेच्या जवळ येण्यापूर्वी अर्धा तास "कोणतीही स्पष्ट हालचाल नाही" दिसत नव्हती. हल्ल्यादरम्या शॉटर पूर्पणे बेशुद्ध होती, असं फिर्यादीने सांगितले. सीसीटीव्हीमध्ये दोषी शॉटरचं शरीर वेगवेगळ्या ठिकाणी नेत तिच्यावर बलात्कार करत होता असं दिसून आलं आहे. 17 जुलै 2021 च्या पहाटे शॉटरला एका वाटसरूने उद्यानात मृतावस्थेत पाहिलं.
तिच्या तोंडातून घेतलेल्या डीएनएचे नमुने मोहम्मद आयडो याच्याकडून गोळा केलेले नमुने जुळले आहेत. आयडोला 4 ऑगस्ट 2021 रोजी त्याच्या घरी अटक करण्यात आली. लैंगिक संबंध सहमतीने झाले होते असा दावा त्याने चौकशीदरम्यान केला.
"जेव्हा प्रतिवादी तिच्यावर मौखिकपणे बलात्कार करत होता त्या वेळी ती मेली नव्हती. हा प्रतिवादी एका कारणासाठी उद्यानात गेला होता हे तुमच्यासाठी विचारात घेण्यासारखे आहे. त्याने 15 मिनिटांपेक्षा जास्त काळ एखाद्या मृतदेहासोबत सेक्स करण्याचा प्रयत्न केला नसता. जी व्यक्ती जिवंत पण बेशुद्ध आहे अशा व्यक्तीशी तो लैंगिक संबंध ठेवत होता. म्हणजेच तो तिच्यावर बलात्कार करत होता", असा युक्तिवाद करण्यात आला.