'रेनो'नं लॉन्च केली नवी Kwid

हे नवीन व्हर्जन अनेक फिचर्ससोबत येणार आहे 

Updated: Aug 2, 2018, 02:23 PM IST
'रेनो'नं लॉन्च केली नवी Kwid  title=

मुंबई : भारतात एन्ट्री लेवल हॅचबॅक सेगमेंटमध्ये 'क्विड'च्या अतिशय लोकप्रिय गाड्यांपैंकी एक... लॉन्चिंगनंतर केवळ दोन वर्षांच्या काळात क्विडच्या अडीच लाखांहून अधिक गाड्यांची विक्री झालीय. ही कंपनीची भारतात सर्वात विकली जाणारी गाडी आहे. 'क्विड'ची दोन वर्ष पूर्ण केल्यानंतर आता रेनोनं क्विडचं नवं व्हर्जन लॉन्च केलंय. हे नवीन व्हर्जन अनेक फिचर्ससोबत येणार आहे.

कॅमेरा, पॉवर विन्डो, सेंट्रल लॉकिंग सिस्टम, मागच्या सीटसाठीही सीट बेल्ट यांसहीत अनेक सेफ्टी फिचर्स जोडण्यात आलेत.

काही मॉडल्समध्ये रिअर आर्म रेस्ट, पॉवर स्टिअरिंग, इंजिन इनोबिलायजर, ३ आणि ४ स्पीड मॅन्युअल एसी, पॉवर विन्डो, ट्राफिक असिस्ट, रिमोट सेंट्रल लॉकिंग, रिअर ELR असे फिचर्सही जोडण्यात आलेत. 

परंतु, नव्या क्विडच्या इंजिनमध्ये मात्र कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीत. दोन इंजिन ऑप्शन असेलेले रेनो क्विडचे आठ व्हेरिएन्ट बाजारात उतरवण्यात येणार आहेत. नव्या 'क्विड २०१८' ची किंमत २.६६ लाखांपासून सुरूवात होते.