भारत 4जी मध्ये अव्वल तर इंटरनेट स्पीडमध्ये पिछाडीवर

 आजकाल स्मार्टफोन आणि टेलिकॉम कंपन्यांमध्ये 4जी अधिक स्वस्त दरामध्ये उपलब्ध करून देण्यासाठी युद्ध सुरू आहे. लवकरच 5जी देखिल उपलब्ध होईल. 

Updated: Feb 21, 2018, 11:53 PM IST
भारत 4जी मध्ये अव्वल तर इंटरनेट स्पीडमध्ये पिछाडीवर  title=

 मुंबई : आजकाल स्मार्टफोन आणि टेलिकॉम कंपन्यांमध्ये 4जी अधिक स्वस्त दरामध्ये उपलब्ध करून देण्यासाठी युद्ध सुरू आहे. लवकरच 5जी देखिल उपलब्ध होईल. 

ओपनसिग्नलने दिलेल्या माहितीनुसार भारत अजूनही इंटरनेट स्पीडच्या शर्यतीमध्ये पिछाडीवर आहे. या अहवालाकरिता जगभरातील इंटरनेट स्पीडचा अभ्यास करण्यात  आला.  

 4जीमध्ये भारत अव्वल 

 रिपोर्टनुसार देशात सध्या 4जी इंटरनेटचं  86.3 टक्के कव्हरेज आहे. 4जीच्या शर्यतीमध्ये भारताने श्रीलंका आणि पाकिस्तान या देशांना मागे टाकले आहे. भारतात 4G इंटरनेट स्पीड 6.07 MBPS आहे तर  पाकिस्तानमध्ये  13.56  MBPS आणि श्रीलंकेमध्ये 13.95 MBPS आहे. 

 
इंटरनेट स्पीडमध्ये सिंगापूर अव्वल 

भारत 4जीत अव्वल असले तरीही इंटरनेट स्पीडमध्ये मात्र सिंगापूर अग्रस्थानी आहे. सिंगापूरमध्ये 4जीचा स्पीड 44.31 MB आहे. नेदरलँडमध्ये 4G इंटरनेट स्पीड 42.12 एमबीपीएस आहे. त्यापाठोपाठ नॉर्वे 41.20 MBPS दक्षिण कोरिया 40.44 MBPS आणि हंगेरी 39.18 MBPS आहे.