america

अमेरिकेच्‍या आण्विक पाणबुडीला अपघात

अमेरिकेच्या आण्विक पाणबुडीला आज रविवारी कवायती करताना अपघात झाला. हा अपघात पाणबुडची क्रूझ जहाजाला धडक बसल्याने झाला. या अपघातात पाणबुडीच्या अणुभट्टीचे कोणतेही नुकसान झाले नाही.

Oct 14, 2012, 11:12 PM IST

अबू हमजा अमेरिकेच्या ताब्यात

अमेरिकेच्या न्यायालयाने असा आदेश दिलाय की कुख्यात अतिरेकी आणि धर्मगुरू अबू हमजा अल-मसरी याला नऊ ऑक्टोबरपर्यत औपचारिक रित्या गुन्हे दाखल करण्याआधी ताब्यात ठेवण्यात येईल. ब्रिटनने हमजा आणि इतर चार संशयितांचे प्रत्यार्पण केले आहे. हमजाने अमेरिकविरूध्द चार वर्षे लढा दिल्यानंतर आता हमजाला संघीय न्यायालयात हजर केल गेलंय.

Oct 7, 2012, 10:00 PM IST

पैंगबरचा अपमान, अमेरिकन दुतावासावर जीवघेणा हल्ला

लिबीयाच्‍या बेनगाजी आणि इजिप्‍तच्‍या कैरो शहरात अमेरिकेच्‍या दूतावासावर हल्‍ला करण्‍यात आला.

Sep 12, 2012, 04:16 PM IST

अमेरिका: गुरूद्वारामध्ये बेछूट गोळीबार, ७ ठार

अमेरिकेतल्या ओकक्रिक शहरातल्या गुरद्वारामध्ये अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केल्याची घटना घडली आहे... या घटनेत ७ ठार तर पंचवीसजण जखमी झाले आहेत.

Aug 6, 2012, 08:16 AM IST

विजय माझाच - ओबामा

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक तोंडावर येऊन ठेपलीय. अमेरिकेचे सद्य राष्ट्रपती बराक ओबामा यांना मात्र आपण प्रतिद्वंदी मिट रोमनी यांच्यावर विजय मिळवू, अशी पूर्ण खात्री आहे. पण, ही लढत इतकी सोपी नसल्याचंही त्यांनी मान्य केलंय.

Jul 31, 2012, 01:41 PM IST

अमेरिकेतून ओबामांचा भारताला सल्ला

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी भारताला सल्ला देताना विदेशी गुंतवणुकीसाठी दरबाजे बंद सल्याचे म्हटले आहे. भारतात सध्या अनेक क्षेत्रांत परकीय गुंतवणुकीसाठी अनुकूल वातावरण नसल्याबद्दल त्यांनी पीटीआयला दिलेल्या खास मुलाखतीत नाराजी व्यक्त केली.

Jul 16, 2012, 09:47 AM IST

१ मिनिटात उडवू अमेरिकेची दाणादाण

अमेरिकेने जर इराणवर हल्ला केला तर इराण इस्राइलसह मध्य पूर्वेतील अमेरिकेची ठिकाणं १ मिनिटात उध्वस्त करू अशी इराणने अमेरिकेला धमकीच दिली आहे. तेहरानमध्ये चालू असणारा अण्वस्त्र निर्मितीचा कार्यक्रम थांबवण्यासाठी चर्चेतून मार्ग न निघाल्यास इस्राइल इराणवर हल्ला करेल.

Jul 5, 2012, 08:17 AM IST

पाकच्या माजी मंत्र्यांची अमेरिकेत चौकशी

पाकिस्तानचे माजी मंत्री शेख रशीद यांची चक्क अमेरिकेत ताब्यात घेण्यात आले आणि त्यांची चौकशी करण्यात आली. रशीद यांचे लष्कर ए तैय्यबा आणि मुंबई हल्ल्यातील मुख्य सुत्रधार हाफिज सईद याच्याशी संबंध असल्याच्यी पार्श्वभूमीवर ही चौकशी करण्यात आली. रशीद यांना ह्युस्टन विमानतळावर ताब्यात घेण्यात आले.

Jun 28, 2012, 03:29 PM IST

'पाकिस्तान आंतरराष्ट्रीय डोकेदुखी'

उग्रवादी, गरिबी आणि ढेपाळलेलं सरकार अशी अवस्था असलेलं पाकिस्तान साऱ्या जगाचंच डोकेदुखी ठरतंय, आणि अमेरिकाही इथले प्रश्न सोडवण्यासाठी कमी पडतंय, असं म्हटलंय अमेरिकेच्या माजी विदेशमंत्री मेडली अलब्राईट यांनी. अलब्राईट या सध्या भारत दौऱ्यावर आहेत.

Jun 26, 2012, 10:48 AM IST

तालिबानने केलं भारताचं कौतुक

आज अत्यंत आश्चर्यकारक घटना घडली आहे. आज अफगाणी तालिबानने भारताचं चक्क कौतुक केलं आहे. अमेरिकेने केलेल्या अवाहनाला आणि दबावाला भारत बळी न पडल्याबद्दल तालिबानने भारताचे कौतुक केलं आहे. तालिबानचं म्हणणं आहे की भारत हा या प्रांतातील अत्यंत महत्वाचा देश आहे, यात काहीच शंका नाही.

Jun 17, 2012, 08:12 PM IST

चीन-अमेरिका दोस्ती, इराणची उतरवणार मस्ती

इराणकडून तेल आयात करताना काही अडचण येऊ नये यासाठी अमेरिकेने काही गोष्टींचा विचार करता चीनशी वाटाघाटी सुरू केल्या आहेत. इराणवर अंकुश ठेवण्यासाठी अमेरिका आता चीनची मदत घेतली आहे.

Jun 13, 2012, 02:15 PM IST

अमेरिकेकडून भारताला तेल आयातीत सूट

ईरानकडून भारत तेल आयात करताना काय काय उणीवा भासतात, याचा अभ्यास केलाय अमेरिकेनं... वेगवेगळ्या सुत्रांकडून त्यांनी यासंबंधीचे आकडे मिळवलेत. यामध्ये भारत सरकार तसंच सार्वजनिक क्षेत्राकडून उपलब्ध झालेले आकड्यांचाही समावेश आहे. आणि याच आकड्यांचा अभ्यास करून अमेरिकेनं भारताला वेगवेगळ्या सूट दिल्या आहेत.

Jun 12, 2012, 01:58 PM IST

बीएमएमचे १६वे अधिवेशन जाहीर

अमेरिकेतल्या बृहन महाराष्ट्र मंडळाचे (बी.एम.एम.) १६वे अधिवेशन ५ ते ७ जुलै २०१३ दरम्यान होणार आहे. हे अधिवेशन बॉस्टनलगतच्या र्‍होड आयलंड राज्यातील प्रॉव्हिडन्स शहरात होणार आहे. या अधिवेशनाचे आयोजन बॉस्टन येथील न्यू इंग्लंड मराठी मंडळ करत आहे.

Jun 11, 2012, 08:23 PM IST

भारत ही जागतिक शक्ती - अमेरिका

भारत जगातील मोठी शक्ती असून हा देश आपली जबाबदारी चांगल्या पद्धतीने निभावत आहे, असे मत अमेरिकी संरक्षण मंत्रालय असलेल्या पेंटागॉनने नोंदविले आहे

Jun 7, 2012, 07:48 PM IST

अमेरिकेत काली मातेच्या नावाची बिअर!

अमेरिकेसह पाश्चात्य देशात हिंदू देवी-देवतांच्या चित्रांचा दुरपयोग तसेच त्यांचा विचित्र पद्धतीने केलेल्या वापरामुळे भाजपने आज राज्यसभेत आवाज उठवला आहे. अमेरिकेत एका बिअर कंपनीने आपल्या उत्पादनाचे नाव काली मातेवर ठेवले असल्याची धक्कादायक माहिती आज भाजपतर्फे राज्यसभेत देण्यात आली.

May 15, 2012, 08:18 PM IST