Pune Crime : दोन लेकरांना झोपेतच संपवलं, पतीवर कोत्याने वार केले; महिलेचे भयानक कृत्य पाहून पोलिसही हादरले

 जन्मदात्या आईनेच दोन चिमुकल्यांचा बळी  घेतला आहे. झोपेतच गळा दाबून मुलांची हत्या केली. आरोपी महिलेने पतीवर देखील कोयत्याने वार केले आहेत. 

वनिता कांबळे | Updated: Feb 8, 2025, 02:58 PM IST
Pune Crime : दोन लेकरांना झोपेतच संपवलं, पतीवर कोत्याने वार केले; महिलेचे भयानक कृत्य पाहून पोलिसही हादरले title=

Pune Crime News :  जन्मदात्या आईनेच घेतला दोन चिमुकल्यांची निर्घणपणे हत्या केली आहे. या महिलेने झोपेतच मुलांचा गळा दाबून त्याचा जीव घेतला. यानंतर आरोपी महिलेने पतीवर देखील कोयत्याने वार केले. पुण्यात ही धक्काकादयक घटना घडली आहे. महिलेने असं कृत्य करण्यामागे जे कारण समोर आले आहे ते ऐकून पोलिसही शॉक झाले आहेत. 

पुण्याच्या दौंड परिसरात ही अत्यंत विचित्र प्रकार घडला आहे. एका महिलेने चक्क आपल्या दोन चिमुकल्यांचा गळा दाबून हत्या केलीये. यासोबतच या महिलेने आपल्या पतीवर देखील कोयत्याने वार केलेत. दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली मधील शिंदे वस्ती या ठिकाणी ही धक्कादायक घटना घडली असून दौंड पोलिसांनी या आरोपी महिलेला अटक केली आहे. कोमल दुर्योधन मिंढे (वय 30 वर्षे) असे आरोपी महिलेचे नाव आहे.

शंभू दुर्योधन मिढे वय एक वर्ष आणि पियू दुर्योधन मिढे वय तीन वर्ष अशी मयत मुलांची नावे आहेत. या महिलेने तिचा पती दुर्योधन आबासाहेब मिढे वय 35 वर्ष याला देखील कोयत्याने मानेवर आणि हातावर वार करून जखमी केले आहे. पती-पत्नीच्या वादातून आणि सासरच्या जाचाला त्रासून महिलेने हे टोकाचे पाऊल उचलण्याची माहिती मिळत आहे

शनिवारी पहाटेच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली. या घटनेची माहिती मिळताच दौंड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गोपाळ पवार आणि कुरकुंभ चौकी सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी या महिलेला ताब्यात घेतले असून पुढील तपास पोलीस करीत असल्याची माहिती दौंड चे उपविभागीय पोलीस अधिकारी बापूराव दडस यांनी दिली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.