सुप्रिया सुळे

"आमची पंधरा वर्षापासूनची सत्ता गेली ते बरंच झालं"

राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी प्रांजलपणे सत्ता गेली ते बरं झालं, अशी कबुली दिली आहे. राष्ट्रवादी मागील पंधरा वर्षापासून सलग सत्तेत असल्याने, नेत्यांचा जनतेशी संपर्क कमी झाल्याचंही त्यांनी मान्य केलं आहे. आता उलट राष्ट्रवादीचे नेते विरोधात राहून जोरदार भाषण करत आहेत आणि त्यामुळे लोकांच प्रेम वाढतं आहे, असं सुप्रिया सुळे यावेळी म्हणल्या.

Apr 8, 2015, 09:32 PM IST

आबांचा अखेरचा शब्द होता आई - सुप्रिया सुळे

आबा (आर आर पाटील) आज आपल्यात नाहीत यावर खरतर अजूनही मला विश्वास बसत नाही. त्यांना दुर्दैवाने बोलता येत नसल्याने त्यांनी लिहून दाखविले. आबांनी लिहिलेला तो अखेरचा शब्द होता, तो म्हणजे आई, अशी आठवण खासदार सुप्रिया सुळे यांनी जागविली.

Feb 21, 2015, 12:34 PM IST

भाजपाच्या पाठिंब्यावरून राष्ट्रवादीत ‘गृहकलह’!

शरद पवारांच्या निर्णयाला त्यांच्याच घरातून विरोध होत असल्याचं कळतंय. राज्यातील भाजप सरकारला दिलेल्या बिनशर्त पाठिंब्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वैचारिक मतभेद असल्याचं उघड झालंय. अलिबागमध्ये झालेल्या दोन दिवसीय चिंतन शिबीरामध्ये राष्ट्रवादीच्या दुसऱ्या फळीतील नेत्यांची मतं पुढे आलीयेत. त्यातून नेत्यांमधील वैचारिक गोंधळ दिसून आलाय. 

Nov 20, 2014, 11:43 AM IST

अफजलखान कोण?, मोदी की अमित शहा?, सुप्रिया सुळेंचा सवाल

शरद पवार यांच्या कन्या आणि राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. उद्धव ठाकरे यांना नेमकं अफजलशहा कुणाला म्हणायचं आहे, नरेंद्र मोदी यांना की, अमित शहांना, हे त्यांनी जनतेला सांगावं, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.

Oct 8, 2014, 10:04 PM IST

तुम्ही असाल पंतप्रधान, खोटे आरोप कराल कोर्टात खेचू - सुप्रिया सुळे

पवार कुटुंबीयांवर भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून आरोप करण्यात आल्याने खासदार आणि राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे संतप्त झाल्यात. त्यांनी विरोधकांना थेट कोर्टात घेण्याचा इशाराच दिला.

Oct 6, 2014, 01:20 PM IST

'वाळू तस्करी थांबवण्यासाठी सर्व पक्षांनी एकत्र यावं'

वाळू तस्करी रोखण्यासाठी सर्व पक्षांनी एकत्र येणं गरजेच असल्याचं मत राष्ट्रवादीच्या खासदार आणि नेत्या सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे. 

Oct 3, 2014, 12:55 PM IST