राज ठाकरे

पोटनिवडणुकीसाठी राज ठाकरेंनी राणेंना पाठिंबा नाकारला

वांद्रे विधानसभेच्या पोट निवडणुकीसाठी नारायण राणे यांनी जोरदार मोर्चे बांधणी सुरू केली असल्याचं चित्र आहे. कारण नारायण राणे यांनी काल राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याशी चर्चा केल्यानंतर, आज नितिश राणे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली आहे.

Mar 23, 2015, 05:42 PM IST

भाजप सरकार आघाडीच्याच वाटेवर, राज ठाकरेंची 'आरे'वरून टीका

राजकारण्यांची दुधाची डेअरी चालवण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं सरकारी मालकीचा आरे दुग्धप्रकल्प संपवला. आता राज्यात सत्ताबदल झाल्यावरही भाजपा सरकार आघाडी सरकारचीच री ओढत असून यासाठीच तुम्ही सत्तेवर आलात का? असा सवाल मनसेअध्यक्ष राज ठाकरे  सत्ताधाऱ्यांना विचारला आहे. 

Mar 16, 2015, 02:43 PM IST

राज ठाकरेंनी केली 'आरे'कॉलनीची पाहणी

मेट्रो ३ प्रकल्पाचे काम सुरु होण्यापूर्वीच तो वादात सापडलाय. हा प्रकल्प मराठी माणसाच्या मूळावर उठणारा असल्याचा आरोप करत तो उखडून टाकू अशी भूमिका शिवसेना आणि मनसे या राजकीय पक्षांनी घेतालीये.  या पार्श्वभूमीवर आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे आरे वसाहतीमधील मेट्रोच्या वादग्रस्त कारशेडच्या जागेची पाहणी केली. 

Mar 16, 2015, 12:01 PM IST

राज ठाकरे जेव्हा इंदिराजींचं व्यंगचित्र काढतात...

राज ठाकरे यांच्यातील व्यंगचित्रकार सदैव जागृत असतो. त्याचा प्रत्यय पुण्यात आला.

Mar 13, 2015, 12:55 PM IST

राज ठाकरे, आशिष शेलारांना कारणे दाखवा नोटीस

होर्डिंग्ज प्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि  भाजपचे आमदार आशिष शेलार तसेच मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांना मुंबई उच्च न्यायालयाने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

Mar 12, 2015, 07:08 PM IST

विधानसभा पोटनिवडणूक मनसे लढवणार नाही- राज ठाकरे

महाराष्ट्र नवनिर्माण पक्ष वांद्रे पूर्व आणि तासगाव विधानसभा पोटनिवडणूक लढवणार नसल्याचं स्पष्टीकरण पक्षाध्यक्ष राज ठाकरेंनी दिलं आहे. ही निवडणूक न लढवून बाळा सावंत आणि आर. आर. पाटील यांना श्रद्धांजली दिल्याचंही राज ठाकरे म्हणाले. 

Mar 12, 2015, 03:31 PM IST

राज-उद्धव यांचा मोदींवर हल्लाबोल

राज-उद्धव यांचा मोदींवर हल्लाबोल

Mar 11, 2015, 11:09 AM IST

मनसेचा राडा, मेट्रो-३ कारशेड ऑफिसची तोडफोड

 मेट्रो-३ प्रकल्पाअंतर्गत मार्गात येणाऱ्या झाडांची तोड करण्यास राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने तीव्र विरोध केला आहे. याचा राग आरे कॉलनीत मेट्रो-३ कारशेड ऑफिसची तोडफोड करत काढला.

Mar 10, 2015, 08:03 PM IST