विधानसभा पोटनिवडणूक मनसे लढवणार नाही- राज ठाकरे

महाराष्ट्र नवनिर्माण पक्ष वांद्रे पूर्व आणि तासगाव विधानसभा पोटनिवडणूक लढवणार नसल्याचं स्पष्टीकरण पक्षाध्यक्ष राज ठाकरेंनी दिलं आहे. ही निवडणूक न लढवून बाळा सावंत आणि आर. आर. पाटील यांना श्रद्धांजली दिल्याचंही राज ठाकरे म्हणाले. 

Updated: Mar 12, 2015, 03:31 PM IST
विधानसभा पोटनिवडणूक मनसे लढवणार नाही- राज ठाकरे title=

मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण पक्ष वांद्रे पूर्व आणि तासगाव विधानसभा पोटनिवडणूक लढवणार नसल्याचं स्पष्टीकरण पक्षाध्यक्ष राज ठाकरेंनी दिलं आहे. ही निवडणूक न लढवून बाळा सावंत आणि आर. आर. पाटील यांना श्रद्धांजली दिल्याचंही राज ठाकरे म्हणाले. 

लोकप्रतिनिधींचं आजारपण आणि अपघाती निधनानं ज्या ठिकाणी पोटनिवडणूका लागल्या आहेत. त्या न लढवणं हे पक्षाचं धोरण असल्याचंही राज ठाकरेंनी जाहीर केलं आहे. 

राष्ट्रवादीचे नेते माजी गृहमंत्री सर्वाचे लाडके आबा यांच्या निधनानं तासगाव मतदारसंघ आणि शिवसेनेचे नेते बाळा सावंत यांच्या निधनानं वांद्रे पूर्व मतदारसंघात पोटनिवडणूक होतेय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.