पोटनिवडणुकीसाठी राज ठाकरेंनी राणेंना पाठिंबा नाकारला

वांद्रे विधानसभेच्या पोट निवडणुकीसाठी नारायण राणे यांनी जोरदार मोर्चे बांधणी सुरू केली असल्याचं चित्र आहे. कारण नारायण राणे यांनी काल राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याशी चर्चा केल्यानंतर, आज नितिश राणे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली आहे.

Updated: Mar 23, 2015, 11:18 PM IST
पोटनिवडणुकीसाठी राज ठाकरेंनी राणेंना पाठिंबा नाकारला title=

मुंबई : वांद्रे विधानसभेच्या पोट निवडणुकीसाठी नारायण राणे यांनी जोरदार मोर्चे बांधणी सुरू केली असल्याचं चित्र आहे. कारण नारायण राणे यांनी काल राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याशी चर्चा केल्यानंतर, आज नितिश राणे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली आहे.

मात्र राज ठाकरे यांनी आपला पक्ष निवडणूक लढवत नसल्याचं म्हटलं आहे, कुणालाही पाठिंबा दिला तर आपल्या भूमिकेची प्रतारणा होईल असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. यामुळे नारायण राणे यांना मनसेकडून मदत होईल अशी परिस्थिती नसल्याचं स्पष्ट होत आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.