राज ठाकरे

राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित फेसबूकच्या माध्यमातून भेटीला

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची चिरंजीव अमित यांनी आपले अधिकृत फेसबूक पेज तयार केलेय. या फेसबूक पेजच्या माध्यमातून ते व्यंग्यचित्रकार म्हणूनही लोकांसमोर येत आहे. 

Feb 7, 2017, 08:11 PM IST

शिवसेनेचा नाना आंबोलेंना राणे, राज ठाकरेंचा दाखला

शिवसेना बंडखोरी थोपविण्यात यशस्वी होईल, असा दावा करताना खासदार राहुल शेवाळे यांनी भाजपमध्ये दाखल झालेल्या नाना आंबोलेंना जोरदार टोला लगावलाय. जे सेनेतून बाहेर गेलेत, त्यांचे काय होते, हे राणे, राज ठाकरेंवरुन लक्षात घ्या, असा दाखला दिला.

Feb 3, 2017, 08:10 PM IST

राज ठाकरेंनी जाहीर केली मुंबईतील मनसे उमेदवार यादी

मराठी माणसाठी आपण शिवसेनेपुढे हात पुढे केला होता. मात्र, शिवसेनेकडून काहीही प्रतिसाद आला नाही, अशी कबुली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दादर येथील जाहीर मेळाव्यात दिली. त्यामुळे आपला विषय इथं संपल्याचे सांगत मुंबईत सर्व जागा लढविण्याची घोषणा केली होती. मनसेने आपल्या उमेदवारांची यादी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी जाहीर केली.

Feb 3, 2017, 05:09 PM IST

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनवर राज ठाकरेंचा सवाल

मुंबई कोलकाता, मुंबई नागपूर अशी का नाही काढली, असा सवाल करत राज ठाकरेंनी गुजरातच्या नेत्यांची मुंबईवर नजर असल्याचं म्हटलं आहे.

Feb 2, 2017, 12:26 AM IST

मुंबई हातातून गेली तर परत आणता येणार नाही-राज ठाकरे

आपण मराठी माणसासाठी शिवसेनेकडे हात पुढे केला होता, असं राज ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे.

Feb 2, 2017, 12:15 AM IST

राज ठाकरे म्हणतात, गुगलवर फेकू लिहा आणि पाहा काय दिसतं?

राज ठाकरे यांनी मनसे पदाधिकाऱ्यांच्या सभेत सांगितलं, गुगलवर फेकू लिहून पाहा, काय दिसतं तुम्हाला? असा सवाल राज ठाकरे यांनी केला.

Feb 1, 2017, 09:09 PM IST

मराठी माणसासाठी हात पुढे केला, आता माझ्यासाठी हा विषय संपला - राज ठाकरे

 युतीचा विषय आता माझ्यासाठी संपला आहे, असे म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्वबळावर निवडणुकीत उतरण्याची तयारी दाखवली.

Feb 1, 2017, 08:50 PM IST

राज ठाकरे यांचे भाषणातील ठळक मुद्दे

 महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज कार्यकर्ता मेळाव्यात आज युतीसाठी हात पुढे का केला याची उत्तर दिले... आता माझ्यासाठी हा विषय संपला असल्याचेही राज ठाकरे यांनी सांगितले. 

Feb 1, 2017, 08:49 PM IST

'राज ठाकरे यांनी केला संजय राऊत यांना फोन'

मनसेने युतीचा कोणाताही प्रस्ताव दिला नसल्याचा दावा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला. त्याचवेळी मात्र राऊतांचा दावा मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी खोडून काढलाय. राज ठाकरे यांनी स्वत: संजय राऊत यांना फोन केला होता. तसा निरोप देण्याचे सांगितले होते, असे मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी स्पष्ट केलेय.

Jan 31, 2017, 07:23 PM IST

मनसे अध्यक्ष राज ठाकरे उद्या आपली भूमिका मांडणार

उद्या दादर, शिवाजी मंदिरमध्ये पक्षाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा होणार आहे, त्यावेळी राज ठाकरे आपली भूमिका मांडणार आहेत.

Jan 31, 2017, 06:00 PM IST

राज ठाकरे उद्या मांडणार आपली भूमिका, उमेदवारांची यादी होणार घोषित?

मनसे अध्यक्ष राज ठाकरे उद्या आपली भूमिका मांडणार आहेत. सध्या मनसेची अवस्था बिकट असल्याचे दिसत आहेत. अनेक विद्यमान नगरसेवक दुसऱ्या पक्षात जात आहेत. महापालिका निवडणुकीचे बिगुल वाजले तरी मनसेत शांतता आहे. त्यातच शिवसेनेचा भाजपसोबतचा काडीमोड झाल्याने मनसेने शिवसेनेपुढे युतीचा प्रस्ताव ठेवला होता. मात्र शिवसेनेने त्यांच्या प्रस्तावावर काहीच प्रतिक्रिया दिलेली नाही. तसेच राज यांना वेटिंगवरच ठेवले.

Jan 31, 2017, 05:54 PM IST

राज ठाकरेंचे इंजिन सध्या भरकटलंय....

शिवसेना-भाजप युती तुटल्यानंतर शिवसेना-मनसे एकत्र येणार का, अशा चर्चा सुरू झाल्यात. मनसेकडूनच त्याला खतपाणी घातलं जातंय... मनसेवर ही वेळ का आली? आणि उद्धव ठाकरेंनी त्याला काय प्रतिसाद दिला? 

Jan 30, 2017, 08:25 PM IST