वयाच्या 16 व्या वर्षी लग्न, 18 व्या वर्षी घटस्फोट, दोन जुळ्या मुलांची आई आहे 'ही' अभिनेत्री

या अभिनेत्रीचं 16 व्या वर्षी झालं लग्न, दोन जुळ्या मुलांना दिला जन्म, 18 व्या वर्षी झाला घटस्फोट. कोण आह ही अभिनेत्री? जाणून घ्या सविस्तर

सोनेश्वर पाटील | Updated: Feb 8, 2025, 03:16 PM IST
वयाच्या 16 व्या वर्षी लग्न, 18 व्या वर्षी घटस्फोट, दोन जुळ्या मुलांची आई आहे 'ही' अभिनेत्री  title=

Urvashi Dholakia On Her Divorce: 'कसौटी जिंदगी की' या टीव्ही मालिकेतून अभिनेत्री उर्वशी ढोलकियाला खूप लोकप्रियता मिळाली. या मालिकेत तिने कोमोलिकाची भूमिका साकारली होती. तिच्या या भूमिकेची आजही सोशल मीडियावर चर्चा होते. सौंदर्य आणि तितकीच तिखट अशी भूमिका तिची होती. या मालिकेतून अभिनेत्रीला खूप प्रसिद्धी मिळाली. परंतु, तिच्या वैयक्तिक  आयुष्यामध्ये अनेक चढ उतार देखील पाहायला मिळाले. अभिनेत्री उर्वशी ढोलकियाचे वयाच्या 16 व्या वर्षी लग्न झालं होतं. त्यानंतर तिने 17 व्या वर्षी दोन जुळ्या मुलांना जन्म दिला. तर 18 व्या वर्षी तिचा घटस्फोटही झाला. त्यानंतर तिने तिच्या मुलांना म्हणजेच क्षितिज आणि सागर यांना एकटी आई म्हणून वाढवण्याचा निर्णय घेतला.

अलिकडेच दिलेल्या एका मुलाखतीत उर्वशी ढोलकियाने तिच्या वेगळेपणाबद्दल उघडपणे सांगितले आणि कबूल केले की हे तिच्यासाठी सोपे नव्हते. या मुलाखतीत तिने सांगितले की,  वयाच्या 18 व्या वर्षी झालेल्या घटस्फोटाचा तिच्यावर खूप मोठा परिणाम झाला होता. घटस्फोटानंतर तिने एक महिना स्वतःला एका खोलीत कोंडून घेतले होते.

घटस्फोटानंतर अभिनेत्रीने स्वत:ला खोलीत कोंडून घेयची

उर्वशी ढोलकियाने हॉटरफ्लाईला दिलेल्या मुलाखतीत खुलासा केला आहे की, एक वेळ अशी होता की ती घडलेल्या घटनेचे आत्मपरीक्षण करण्यासाठी महिनाभर स्वतःला एका खोलीत कोंडून घेत होती. ती स्वतःला कोंडून घेयची आणि कोणाशीही बोलत नसायची. ती आपण कसे पुढे जायचे याचा विचार करत असायची.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 वेगळेपणा हा वेगळापणा असतो. तो वेदनादायक असतो. मी ते माझ्यापर्यंत येऊ देऊ शकत नव्हती. मी खूप लहान होते. जर माझे आईवडील तिथे नसते तर मी काय केले असते हे मला माहित नाही. जर मी आज या काळात आणि या युगात तुमच्यासोबत बसले आहे तर याचे श्रेय मला माझ्या पालकांना द्यावे लागेल. कारण जर त्यांनी मला पाठिंबा दिला नसता तर अशा अनेक मुली आहेत ज्यांना पाठिंबा मिळाला नसता.