मलबार हिल नाही ‘रामनगरी’ म्हणा - मनसे
मलबार हिलचं रामनगरी नामकरण करण्यात यावं, अशी मागणी मनसेनं मुंबई महापालिकेकडे केलीय. गेल्या काही काळात भाजपशी मनसेशी वाढती सलगी तर त्यास कारणीभूत नाहीना अशी चर्चा आता सुरु झालीय.
Jun 25, 2013, 08:37 AM ISTदिल्ली कोर्टात.... राज ठाकरे हाजीर हो!
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना २६ जुलैला हजर राहण्याचे आदेश दिल्ली कोर्टाने दिले आहे. बिहारी नागरिकांविरुद्ध तथाकथित द्वेषाचे भाषण करण्याचा आरोप असल्यामुळे दिल्ली कोर्टाने हे आदेश दिले आहे.
Jun 24, 2013, 10:40 PM ISTराज ठाकरेंनी दिला भाजपला इशारा
माझ्या पक्षाबाबत चर्चा करून नका अन्यथा माझ्याशी झालेली इतर चर्चाही उघड करेल असा गर्भित इशारा आज राज ठाकरे यांनी दिला.
Jun 24, 2013, 07:59 PM ISTराज ठाकरेंची आश्वासनं `इंजिना`च्या धुरात विरणार?
नाशिकमध्ये आजवर सत्ताधारी मनसेचा प्रवास पाहता ही आश्वासनं इंजिनाच्या धुरात विरुन जाण्याचीच शक्यता नाशिककरांना जास्त वाटतेय.
Jun 24, 2013, 06:26 PM ISTजनतेकडूनही आहेत मनसेला अपेक्षा - राज ठाकरे
मनसे अध्यक्ष राज ठाकरे रविवारपासून नाशिकच्या दौऱ्यावर आहेत. आज दुपारी ते पत्रकारांना सामोरे गेले. यावेळी त्यांनी नाशिकच्या विकासासाठी मनसे कटीबद्ध असल्याचा पुनरुच्चार केलाय.
Jun 24, 2013, 01:24 PM ISTराज ठाकरेंचा विषय संपला - शिवसेना
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा विषय शिवसेनेसाठी संपलेला आहे. महायुतीत मनसे घेण्याबाबत विषयी चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे. मात्र, राजकारणात काहीही होते. त्यामुळे चर्चाही होतच राहिल, अशी सावध भूमिका शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांनी घेतली.
Jun 22, 2013, 09:34 PM ISTराज ठाकरेंची महायुतीवरून भाजपला तंबी
भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीत राज ठाकरेंच्या मनसेला घेण्यास आपण इच्छुक असल्याचे म्हटले होते. यावर राज यांनी भाजपला कानपिचक्या दिल्यात. महायुतीबाबत जे भाजपने उद्योग सुरू ठेवलेत ते बंद करावेत. आपल्या पक्षात काय चाललेय, त्यात लक्ष घाला, असा टोला राज यांनी हाणला.
Jun 21, 2013, 11:22 PM ISTमहायुतीत मनसे हवा, युतीबाबत भाजप उत्सुक
भारतीय जनता पक्षाने पुन्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेशी सुत जमविण्याचा प्रयत्न केलाय. नवे भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी तसे स्पष्ट संकेत दिलेत. सत्ता काबिज करायची असेल तर मनसेशिवाय दुसरा पर्याय नाही, असे फडणवीस म्हणालेत.
Jun 20, 2013, 05:56 PM ISTवीणा पाटील यांची नवी इनिंग, राज ठाकरेंच्या शुभेच्छा
वीणा पाटील यांच्या नव्या कंपनीच्या पहिल्या ऑफिसचं उदघाटन मंगळवारी कांदिवलीमध्ये झालं. केसरीमधून बाहेर पडल्यानंतर वीणा पाटील यांनी `वीणा पाटील हॉस्पिटॅलिटी प्रायव्हेट लिमिटेड` या नावानं नवी कंपनी सुरू केलीय.
Jun 19, 2013, 10:02 AM IST`मराठी तरुण राज ठाकरेंच्या चुकीची फळं भोगतायत`
‘मराठी तरुणांची डोकी भडकवायची आणि त्यांना मारहाण-तोडफोड करण्यासाठी प्रोत्साहीत करायचं आणि खटला दाखल झाल्यावर आपण त्यातून नामानिराळं व्हायचं... म्हणजेच मराठी तरुण यांच्या शिक्षेची फळं भोगतायत त्यांच्यावर अजूनदेखील खटले सुरू आहेत’
Jun 14, 2013, 10:55 AM ISTद्या राज ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा!
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा आज वाढदिवस... महाराष्ट्राच्या या तरुण नेतृत्वाला`झी २४ तास`कडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...
Jun 14, 2013, 08:23 AM ISTराज ठाकरेंची नवी मागणी, अटक वॉरंट रद्द
ऑक्टोबर, २००८ साली रेल्वे भरती परीक्षेदरम्यान परप्रांतिय उमेदवारांना झालेल्या मारहाण प्रकरणी राज ठाकरे आज वांद्रे कोर्टात हजर राहिले. त्यानंतर त्यांच्यावर बजावण्यात आलेलं अटक वॉरंट रद्द करण्यात आलं. दरम्यान, राज यांनी नवी मागणी केलेय.
Jun 12, 2013, 01:14 PM ISTराज ठाकरे हाजिर हो!
२००८ साली रेल्वे भरती परीक्षेदरम्यान परप्रांतीय उमेदवारांना झालेल्या मारहाण प्रकरणी राज ठाकरे यांना आज वांद्रे कोर्टात हजर रहावं लागणार आहे.
Jun 12, 2013, 11:27 AM ISTवाढदिवस साजरा करू नका, राज ठाकरेंचा आदेश
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या समर्थकांना आपला वाढदिवस न साजरा करण्याचे आदेश दिलेत.
Jun 11, 2013, 11:14 AM ISTराज ठाकरेंचे संकेत, संघटनात्मक फेरबदलाचे
नाशिकमधील मनसेतून शिवसेनेत गेलेले नेते हेमंत गोडसे यांनी केलेले आरोप पाहता राज ठाकरे यांनी त्याची गंभीर दाखल घेतली असून ते लवकरच नाशिकचा दौराही करणार आहेत. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक फेरबदल करण्याचे संकेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बुधवारी मुंबईत झालेल्या बैठकीत दिले आहेत.
Jun 6, 2013, 11:15 AM IST