राज ठाकरे

राज ठाकरेंच्या भेटीला देवेंद्र फडवणीस, चर्चेला उधाण

भाजप प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीला कृष्णकुंजवर दाखल झाले आहेत.

Jun 5, 2013, 12:26 PM IST

राज ठाकरे अजित पवारांच्या बालेकिल्ल्यापासून दूरच?

मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे संधी मिळेल तेव्हा अजित पवार यांच्यावर तोंड सुख घेतात. पण तेच राज ठाकरे अजित पवार यांचा बालेकिल्ला असलेल्या पिंपरी-चिंचवड मध्ये मात्र येत नाहीत.

Jun 2, 2013, 06:36 PM IST

राज ठाकरेंशिवाय सत्तांतराची ताकद महायुतीत- आठवले

राज ठाकरे यांना बाजूला ठेवूनदेखील राज्यात सत्तांतर घडविण्याची ताकद शिवसेना-भाजप अन् रिपाइंच्या महायुतीत आहे, असे प्रतिपादन रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी केले.

Jun 2, 2013, 08:42 AM IST

राज ठाकरे घेणार मनसे नगरसेवकांची वार्षिक परीक्षा!

मनसे अध्यक्ष राज ठाकरे त्यांच्या नगरसेवकांची झाडाझडती घेणार आहेत. गेल्या वर्षभरात मनसेच्या नगरसेवकांनी काय कामं केली याची वार्षिक परीक्षाच राज ठाकरे घेणार आहेत.

May 27, 2013, 10:10 PM IST

राज ठाकरेंनी टाळी द्यावी- रामदास आठवले

महायुतीत राज ठाकरेंनीही सहभागी व्हावं, असं आवाहन रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी केलं आहे. कुर्ल्यामध्ये संकल्प मेळाव्यात रामदास आठवले यांनी राज ठाकरेंना हे आवाहन केलं आहे.

May 26, 2013, 09:42 PM IST

राज ठाकरे तर आमचे मित्र - नितेश राणे

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि राणे कुटुंबीय यांच्यात असणारे मैत्रीचे संबंध नेहमीच दिसून आले आहेत. याबाबत नारायण राणे यांचे पुत्र नितेश राणे यांनी देखील राज आमचे मित्र आहेत असं म्हंटलं आहे.

May 24, 2013, 03:07 PM IST

'बापाचा मुक्का कळला नाही...'

विंदू दारा सिंगच्या अटकेवर राज ठाकरेंनी मार्मिक प्रतिक्रिया दिली. "बापाच्या बॉक्सिंगमधला मुक्का कळाला नाही, मात्र क्रिकेटमधला बुकी कळाला" अशा शब्दांत राज ठाकरेंनी विंदू दारा सिंगच्या अटकेवर आपलं मत व्यक्त केलं आहे.

May 21, 2013, 10:10 PM IST

`मनसे`त अंतर्गत धुसफूस? राज यांचा आदेश मानणार कोण?

पुण्यात एलबीटीच्या निमित्तानं मनसेत पेशवाईची नांदी पहायला मिळतेय. राज ठाकरेंनी जनतेला वेठीला धरु नका, असा इशारा व्यापा-यांना दिल्यानंतरही, मनसेचे सरचिटणीस आणि पुण्याचे प्रभारी अनिल शिदोरे यांनी व्यापा-यांविरोधात आंदोलन करु नये असा फतवा काढलाय.

May 19, 2013, 04:28 PM IST

लोकांच्या जे हिताचं असेल, ते करा- राज

महालक्ष्मी रेसकोर्सबद्दल राज ठाकरे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. लोकांच्या हिताचे जे असेल, तेच करावे अशा शब्दांत राज ठाकरे यांनी आपली प्रतिक्रिया दिली.

May 13, 2013, 07:28 PM IST

ताबडतोब दुकानं उघडा, नाहीतर आम्ही ती उघडू- राज

LBTच्या मुद्द्यावरून संपावर असलेल्या व्यापा-यांना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी निर्वाणीचा इशारा दिलाय.

May 12, 2013, 07:17 PM IST

भुजबळांचा राज ठाकरेंना टोला....

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलेल्या टीकेलाही सार्वजनिक मंत्री छगन भुजबळांनी प्रत्युत्तर दिलं आहे. राज यांनी भ्रष्टाचारी अधिका-यांचं अंकगणित मांडलं होतं.

May 11, 2013, 04:15 PM IST

मुजोर व्यापाऱ्यांनी सीएम, राज, उद्धव यांना धुडकावले

एलबीटी कर रद्द करण्याच्या मागणीसाठी राज्यभरात व्यापाऱ्यांनी संप पुकारलाय. याचा सर्वसामान्यांना प्रचंड त्रास होतोय. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह अनेकांनी जनतेला वेठाला न धरण्याचं आवाहन वारंवार केलंय. असं असतानाही व्यापाऱ्यांनी संप सुरूच ठेवलाय. आता मनसे आणि शिवसेना याबाबत काय भूमिका घेणार, याकडे सर्वसामान्यांचं लक्ष लागलंय.

May 9, 2013, 12:28 PM IST

राज ठाकरेंना भुजबळांचं प्रत्यूत्तर...

‘माझे अनेक हितशत्रू आहेत. माझं नाव घ्यायला त्यांना आवडतं... आता त्याला मी तरी काय करू?’ असा सवाल करत छगन भुजबळ यांना राज ठाकरेंच्या प्रश्नाला उडवून लावलंय.

May 8, 2013, 04:38 PM IST

`...तर PWD च्या मंत्र्याकडे किती संपत्ती?`

चिखलीकर याच्या संपत्तीच्या सुरस कहाण्यांनी केवळ सामान्यांनाच नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनाही आश्चर्यचकीत केलंय. पण, राज ठाकरे यांना मात्र या कहाण्या ऐकल्यानंतर वेगळाच प्रश्न पडलाय.

May 7, 2013, 05:15 PM IST

शाहरूख हा काय दहशतवादी आहे का? - राज ठाकरे

‘शाहरूख खान हा काय दहशतवादी आहे का?’ `मला असं वाटतं मागच्या वेळेला ज्या गोष्टी झाल्या त्या झाल्या.. अशाप्रकारची गोष्ट करणं म्हणजे बालीश आहे.

May 7, 2013, 01:57 PM IST