www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
शिवसेनेने पुन्हा एकदा स्पष्ट केलं आहे की, महायुतीमध्ये मनसेची कोणतीही गरज नाही. शिवसेनेचे नेते आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी म्हटलंय, एमएनएस आणि राज ठाकरे यांची पक्षाला कोणतीही गरज नाही.
भाजपचे नेते नितिन गडकरी आणि राज ठाकरे यांच्यात मुंबईत एका फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये चर्चा झाली, यानंतर शिवसेनेने ही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
महायुतीमध्ये राज ठाकरे किंवा शरद पवार यांचा समावेश करण्यात आला तर त्याचा परिणाम महायुतीवर तात्काळ होणार, असल्याचं शिवसेनेचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
महायुती राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादीला पराभूत करेल, तसेच ४८ पैकी ४० जागांवर विजय मिळवणे शक्य असल्याचंही यावेळी संजय राऊत यांनी सांगितलंय.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.