कोकणात पूरस्थिती, विद्यार्थी गेला वाहून
कोकणात जोरदार वृष्टी होत असल्याने अनेक नद्यांना पूर आलाय. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. चिपळूण, संगमेश्वर, राजापूर येथे नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडलेय. तर पोलादपूर येथे १३ वर्षीय शालेय विद्यार्थी वाहून गेला.
Jul 3, 2013, 04:10 PM ISTकोकणात मुसळधार, रेल्वे-रस्ता वाहतुकीवर परिणाम
गेल्या दोन दिवसांपासून कोकणात मुसळधार पाऊस होत आहे. याचा परिणाम मुंबई-गोवा रस्ता वाहतूक आणि कोकण रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला आहे. संगमेश्वर तालुक्यातील आरवली येथे दरड कोसळ्याने रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे. दरम्यान, कोकण रेल्वे प्रशासनाने प्रवाशांसाठी हेल्पलाईन सेवा सुरू केलेय.
Jul 3, 2013, 08:30 AM ISTकोकण रेल्वेला पावसाचा तडाखा, रूळावर माती
विलवडे रेल्वे स्थानकाजवळ दरड कोसळल्याने कोकण रेल्वेची वाहतूक सुमारे दीड तास खोळंबली होती. रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. या पावसाचा तडाखा विलवडे स्थानकाला बसला. पावसामुळे रूळावर माती आणि दगड आल्याने वाहतूक बंद पडली.
Jun 25, 2013, 02:26 PM ISTकोकण रेल्वेचे मान्सून वेळापत्रक
कोकण रेल्वेने मान्सूनसाठीचे नवे वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार काही गाडयांच्या वेळा बदलण्यात आल्या आहेत. हे नवे वेळापत्रक १० जून ते ३१ ऑक्टोबरसाठी लागू असेल.
Jun 6, 2013, 08:20 AM ISTकोकण रेल्वेची वाहतूक विस्कळीत
कोकण रेल्वे मार्गावरील सेवा विस्कळीत झाली आहे. त्यामुळे पाच ते सहा तास गाड्या लेट आहेत. संगमेश्वर येथे रूळाला तडे गेल्याने रेल्वे सेवेवर परिणाम झाला आहे.
May 6, 2013, 11:30 AM ISTकोकण रेल्वेचा प्रवास होणार सुखकर
कोकण रेल्वेच्या मार्गावरील प्रवास आता काहीप्रमाणात सुखकर होणार आहे. सुट्टीचा हंगाम लक्षात घेऊन ३८ विशेष गाड्या तर जनशताब्दी, राज्यराणी एक्स्प्रेस या गाडींचे डबे वाढविण्यात आले आहेत. त्यामुळे गर्दीवर थोडासा दिलासा मिळणार आहे.
Apr 22, 2013, 04:10 PM ISTकोकण रेल्वे मार्गावर रात्री विशेष गाडी
बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर अखा महाराष्ट्रासह देश शोकसागरात बुडाला आहे. कोकणातील शिवसैनिकांसाठी मुंबईत येणाऱ्यासाठी मडगाव ते मुंबई खास रेल्वे सोडण्याचा निर्णय कोकण रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. ही रेल्वे रात्री दहावाजता मडगाववरून सुटेल.
Nov 17, 2012, 09:41 PM ISTकोकण रेल्वे मार्गावर वातानुकूलीत गाड्या
गणेशोत्सव काळात प्रचंड गर्दीत कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना प्रवास करावा लागला होता. तर तीन महिने आधीच तिकिटेही बुक झाली होती. त्यामुळे जादा गाड्या सोडण्यात आल्या होत्या. तरीही गर्दी काही आटोक्यात नव्हती. त्यामुळे कोकण रेल्वे मार्गावरून हजरत निजामुद्दीन-मडगाव स्थानकांदरम्यान ८ वातानुकूलित हिवाळी विशेष गाड्या सोडण्यात येणार आहेत.
Oct 4, 2012, 11:59 AM ISTबाप्पा पावला, कोकणासाठी जादा रेल्वे
कोकणात मोठ्या उत्सहात गणेशोत्सव साजरा केला जातो. त्यासाठी चाकरमानी गावाचा रस्ता धरतात. मात्र, यावेळी दोन महिने आधीच रेल्वेचे आरक्षण फुल झाले होते. त्यामुळे गावाला जायचे कसे, असा प्रश्न गणेश भक्तांना पडला होता. मात्र, हा प्रश्न निकालात निघाला आहे. कोकणात जाणा - या भाविकांच्यासुविधेसाठी मध्य रेल्वेने सीएसटी ते मडगाव मार्गासाठीदररोज ३८ विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे .
Aug 9, 2012, 08:51 PM ISTपावसाचा तडाखा, कोकण रेल्वे ठप्प
कोकणात मुसळधार पाऊस कोसळत असल्याने याचा फटका कोकण रेल्वेला बसला आहे. विलवडे ते वैभवाडी दरम्यान सायंकाळी ४.३० वाजता कोकण रेल्वे रूळावर दरड कोसळ्याने कोकण रेल्वेसेवा विस्कळीत झाली आहे. वैभवाडीत जनशताब्दी थांबून ठेवण्यात आली आहे. रूळावरील माती हटविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
Jul 20, 2012, 06:43 PM ISTकोंकण रेल्वेची 'हिमालय' झेप
सह्याद्रीत यशस्विरीत्या रेल्वेमार्ग उभारण्याची ऐतिहासिक कामगिरी करणाऱ्या कोकण रेल्वेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेलाय. कोकण रेल्वेनं थेट हिमालयाएवढी झेप घेत जम्मू-काश्मीरला जोडणारा रेल्वेमार्ग उभारण्याची जबाबदारी स्विकारलीय.
Jun 16, 2012, 04:14 PM ISTकोकण रेल्वेचे पावसाळ्यापूर्वी अडथळे दूर
दरवर्षीप्रमाणे यंदाही कोकण रेल्वे प्रशासनाने मान्सूनपूर्व कामांना सुरुवात केलीय. गतवर्षी पावसाळ्यात डोकेदुखी ठरलेल्या पोमेंडी रेल्वे मार्गावरील अजस्त्र डोंगर हटवण्याचे काम जवळपास पूर्ण झालंय. तरीही रेल्वेमार्गाला असलेला धोका कायम आहे.
Jun 1, 2012, 08:15 PM ISTकोल्हापुरातून झुकूझुक आगीनगाडी कोकणात
कोल्हापुरातून वारणानगर अथवा राधानगरीमार्गे राजापूर, अशी नव्याने कोकण रेल्वे धाऊ लागेल. त्यासाठी चाचपणी सुरू होऊन निविदा काढण्याची प्रक्रीया सुरू झालीय.
Jan 3, 2012, 04:06 PM ISTदिवाळीसाठी खास रेल्वे
दिवाळीसाठी गावी जाणार-या प्रवाशांच्या सोयासाठी मध्य रेल्वने २५ आॅक्टोबरपासून खास विशेष गाड्या सो़डण्याचा निर्णय घेतला आहे.
Nov 5, 2011, 01:21 PM ISTकोकण रेल्वे सुरक्षिततेला प्राधान्यक्रम देणार
कोकण रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी स्टेशनवर सीसीटीव्ही आणि बॅगा तपासणीसाठी स्कॅनिंग मशीन लावण्यात येणार आहे. कोकण रेल्वेच्या 22 व्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं प्रवाशांना ही भेट देण्याचा मानस रेल्वेनं व्यक्त केला आहे.
Oct 18, 2011, 03:21 PM IST