Vikrant Massey Retirement: बॉलिवूड अभिनेता विक्रांत मेसी त्याच्या रिटायरमेंटच्या घोषणेमुळे चर्चेत आहे. काल सोमवारी त्यानं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत याची घोषणा केली. त्याच्या घोषणेनंतर त्याच्या चाहत्याला मोठा धक्का बसला आहे. त्यानं यावेळी सांगितलं की 2025 मध्ये तो शेवटचे दोन चित्रपट करणार आणि त्यानंतर तो इंडस्ट्री सोडणार आहे. पण त्यानं हा निर्णय का घेतला त्या मागचं खरं कारण काय याविषयी सतत चर्चा सुरु झाली. त्यातही करिअरच्या शिखरावर असताना विक्रांतनं हा निर्णय घेतल्यानं सगळ्यांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. दरम्यान, दिग्दर्शक आणि विक्रांतचा जवळच्या एका व्यक्तीनं विक्रांतच्या या निर्णयामागचं खरं कारण सांगितलं आहे.
इंडिया टुडेला या दिग्दर्शकानं माहिती दिली की विक्रांतला स्वत: बद्दल इतकी चर्चा नको आहे. त्याच्याकडे चित्रपट आणि ओटीटीच्या अनेक ऑफर आहेत. त्याला या गोष्टीचं वाईट वाटतं की तो स्वत: ला एक्सपोज करतोय आणि प्रेक्षक लवकरच त्याला कंटाळतील. त्यानं अनेकदा बोलत असताना त्याला असलेल्या या भीती विषयी त्यानं सांगितलं आहे. त्यानं घेतलेला हा खूप मोठा निर्णय आहे की तो ब्रेक घेऊन त्याला स्वत: ला काही वेळ द्यायचं आहे. तर असं त्यानं असं का करु नये.
हेही वाचा : समुद्र किनारी योगा करणं 24 वर्षीय अभिनेत्रीला पडलं महागात; अचानक भलीमोठी लाट आली आणि...
दुसऱ्या एका सुत्रानं दिलेल्या माहितीनुसार, त्यानं हा निर्णय 'डॉन 3' मुळे घेतल्याची शक्यता आहे. 'डॉन 3' मध्ये विक्रांत मेसी हा खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. अशी शक्यता आहे की एक्सेल एंटरटेनमेंटच्या अंतर्गत बनवण्यात आलेल्या या चित्रपटात विक्रांत खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. मला आश्चर्य आहे की त्यानं हा ब्रेक स्वत: ला ब्रेक देण्यासाठी आणि थोडे बदल करण्यासाठी घेतला आहे. त्यामुळे तो नवीन लूक आणि स्टाईलमध्ये तो स्वत: ला रिलॉन्च करण्यासाठी सज्ज होईल. विक्रांत नेहमीच विचार करुन निर्णय घेणारी व्यक्ती आहे. तो अशा लोकांपैकी एक आहे जो कारण नसताना काही करेल. तर ब्रेक डॉन 3 शी हा संबंधीत असेल.'