7 वर्षांनंतर संपलं मामा-भाच्याचं भांडण, गोविंदाच्या मुलीने सांगितलं कारण –'मी मुद्दामूनच हस्तक्षेप केला नाही कारण…'

नुकताच कपिल शर्माच्या शोमध्ये बॉलिवूडचा सुपरस्टार गोविंदा आणि त्याचा भाचा कृष्णा अभिषेक यांच्यात तब्बल सात वर्षांपासून चालू असलेलं भांडण संपुष्टात आलं. या दोन कलाकारांमधील वाद संपून परत एकमेकांना मिठी मारतांनाचा भावनिक क्षण शोमध्ये घडला. प्रेक्षकांसाठी हा खूप खास आणि हृदयस्पर्शी प्रसंग ठरला. 

- | Updated: Dec 3, 2024, 01:19 PM IST
7 वर्षांनंतर संपलं मामा-भाच्याचं भांडण, गोविंदाच्या मुलीने सांगितलं कारण –'मी मुद्दामूनच हस्तक्षेप केला नाही कारण…' title=

Tina Ahuja Reacts On Govinda Krushna Fight: आपण गेल्या काही वर्षांपासून पाहातोय की गोविंदा आणि कृष्णा अभिषेकचे भांडण सतत सोशल मीडियावर चर्चेत होते. कृष्णा अभिषेक ज्या शोमध्ये काम करतो त्यातचं हिंदी सिनेमातील नंबर 1 हिरो गोविंदा, शक्ती कपूर आणि चंकी पांडे या कलाकारांनी हजेरी लावली. हा कपिल शर्माचा 'द ग्रेट इंडियन कपिल शो' आहे ज्यात हे कलाकार पाहुणे म्हणून आले होते. या शोमध्ये  त्यांनी भरपूर गप्पा मारल्या, जुन्या गोष्टी ताज्या पुन्हा ताज्या केल्या आणि खूप मजा-मस्ती केली. परंतु या शोमधील सगळ्यात लक्ष वेधून घेणारा क्षण म्हणजेचं, मामा- भाच्च्याची गळा भेट. या शोमध्ये गोविंदा आणि कृष्णा यांनी एकमेकांना मिठी मारून, गेल्या काही वर्षांपासून चाललेली भांडण संपवली. हा क्षण पाहून प्रेक्षकही भावुक झाले होते. हा क्षण कृष्णा आणि गोविंदा यांच्यासाठी खूप खास होता. तसेच त्यांच्या चाहत्यांसाठीही खूप महत्त्वाचा, कारण तब्बल 7 वर्षांनी हे दोघे एकत्र आले होते.

या प्रसंगी गोविंदाने आपल्या आणि कृष्णाच्या भांडणाबद्दल बोलताना सांगितलं की, 'एकदा मी खूप रागावलेलो होतो. मी म्हटलं होतं की हे लोक कृष्णाकडून डायलॉग्स लिहून घेतात. त्यानंतर माझी पत्नी सुनीता हिने मला समजावलं की प्रत्येकजण आपापल्या कर्तृत्वावर काम करत असतो. कृष्णा मेहनतीने आपलं करिअर घडवत आहे, त्याला त्याचं काम करू द्यावं.'

या प्रसंगी कृष्णाने देखील आपल्या मामाकडे माफी मागितली. त्याने म्हटलं, 'तुमच्यावर माझं प्रेम आहे, आणि जे काही केला त्याबद्दल माफी मागतो.' गोविंदाने त्याला शांतपणे सांगितलं, 'तू तिची (सुनीता अहुजा) माफी मागायला हवी, कारण ती तुझ्यावर खूप प्रेम करते. यावर कृष्णाने त्याच्या मामीकडे देखील माफी मागितली आणि म्हंटला, 'मी तुमच्यावरही प्रेम करतो मला माफ करा' यावर सुनिता अहुजाची काही प्रतिक्रिया आलेली नाही, पण या सर्व प्रसंगावर गोविंदाची मुलगी टीना अहुजाने आपली प्रतिक्रिया दिली.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

एका मुलाखतीत तिने सांगितलं, 'मी मुद्दामूनच या भांडणात हस्तक्षेप केला नाही. मी माझ्या आयुष्यात आनंदी आहे आणि मला जुन्या वादांना पुन्हा उकरून काढायचं नव्हतं. जेव्हा मी माझ्या भावांना भेटते, तेव्हा सगळं व्यवस्थित आणि आदरयुक्त वातावरण असतं. माझ्यासारखेचं आता इतरही आपल्या आयुष्यात व्यस्त आहेत.' 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

कपिल शर्माच्या शोमुळे गोविंदा आणि कृष्णाच्या नात्यातील दुरावा संपून परत नात्यातील गोडवा परतला. हे संपूर्ण बॉलिवूडसाठी आणि चाहत्यांसाठी आनंदाची गोष्ट ठरली आहे.