Wedding Viral Video : लग्नाचा सिझन असल्याने सोशल मीडियावर असंख्य लग्नाचे व्हायरल होत असतात. वधू वरासोबत लग्नाची विधीचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर पाहिला मिळतात. सध्या लग्न हा एक संस्कार राहिला नसून तो एक इव्हेंट झालाय. लग्नावर लाखो रुपये खर्च होताना पाहिला मिळतात. श्रीमंत लोक तर लग्नाचा सोहळा मोठ्या शाही प्रकारे करता. या सोहळ्यासाठी पैसा पाण्यासारखा खर्च करतात. सध्या सोशल मीडियावर अशाच एका लग्नाचा व्हिडीओ व्हायरल होतो आहे. या लग्नात पैशाचा जणू काही पाऊसच पडला. इथे वरापासून प्रत्येक जण श्रीमंत झाले असे म्हणायला हरकत नाही. तुम्ही या लग्नाचा व्हिडीओ पाहिला का? (Meerut Nikah Viral Video)
सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडीओ हा उत्तर प्रदेशातील मेरठचा असल्याचं सांगितलं जातंय. मीडिया रिपोर्टनुसार मेरठ बायपास रोडवर दिल्ली दून हायवेवर एका आलिशान रिसॉर्टमध्ये झालेल्या लग्न सोहळ्यात पैशांचा पाऊस झाला. या लग्नात वराला वधूपक्षाकडून सूटकेसमध्ये 2 कोटी 56 लाख रुपयांचा हुंडा देण्यात आला. एवढंच नाही तर जेव्हा वराचे बूट मेहुणीने चोरल्यावर तिला 11 लाख रुपये देण्यात आले. एवढंच नाही तर त्यासोबत निकाह लावणाऱ्या काझीला 11 लाख देण्यात आले. गोष्ट इथेच थांबत नाही, मशिदीला 8 लाख रुपये दान म्हणून देण्यात आले.
मेरठ में आलीशान निकाह में दूल्हे पर बरसे करोड़ों रुपये
2.56 करोड़ जहेज
11 लाख जूता चुराई
11 लाख निकाह पढ़ाई
8 लाख मस्जिद को दान pic.twitter.com/COw8SeHPNI— Tahir Kamran | (@TahirBijnori) December 2, 2024
या लग्नात पैशांचा व्यवहार सुरु असताना उपस्थितीत लोकांना त्याचा व्हिडीओ काढला. आता या लग्नाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या प्रकारामुळे बहुसंख्य लोक या विवाह सोहळ्याला समाजासाठी धोका असल्याचं म्हणत आहेत. काही लोक याला लग्नात केलेला दिखाऊ खर्च म्हणत आहेत, तर अनेक लोक एवढ्या रोख रकमेवर प्रश्न उपस्थित करत आहेत. तर काही यूजर्सने म्हटलं की, अशा घटनांमुळे गरीबांच्या मुलींचं लग्न होतं नाहीत.
एका मीडिया रिपोर्टनुसार, या लग्नाबाबत अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की लग्न ही वैयक्तिक आणि कौटुंबिक बाब आहे. आम्ही याबद्दल काहीही करू शकत नाही. मात्र, कोणत्याही पक्षाकडून तक्रार आल्यास आम्ही तपास करू शकतो.