मुंबई : भारतातल्या प्रथम श्रेणी क्रिकेटच्या मोसमातील पहिली स्पर्धा असलेल्या दुलीप ट्रॉफीसाठीच्या टीमची घोषणा झाली आहे. इंडिया ब्लू, इंडिया रेड आणि इंडिया ग्रीन अशा तीन टीम असलेल्या दुलीप ट्रॉफीची सुरुवात १७ ऑगस्टपासून होणार आहे. मागच्या मोसमामध्ये विदर्भाला पहिल्यांदाच रणजी ट्रॉफी जिंकवणारा कर्णधार फैज फैजलला इंडिया ब्लूचं नेतृत्व देण्यात आलं आहे. श्रीलंका दौऱ्यावर भारतीय टेस्ट टीममध्ये पुनरागमन करणारा ओपनिंग बॅट्समन अभिनव मुकुंदला इंडिया रेडचं कर्णधार करण्यात आलं आहे. तर विकेट कीपर पार्थिव पटेल इंडिया ग्रीनचा कर्णधार असेल.
रणजी ट्रॉफीच्या मागच्या मोसमात खोऱ्यानं रन करणाऱ्या पृथ्वी शॉ आणि ऋषभ पंतला या टीममध्ये संधी देण्यात आलेली नाही. भारतीय ए टीममध्ये त्यांची निवड झाल्यामुळे ते दुलीप ट्रॉफीला मुकणार आहेत. विदर्भाला रणजी ट्रॉफी जिंकवून देणारे रजनीश गुरबानी इंडिया रेड आणि अक्षय वाघरे इंडिया ब्लूकडून खेळतील. बसील थंपी आणि जयदेव उनाडकट फैजच्या नेतृत्वात खेळतील. भारताचा माजी बॉलर नरेंद्र हिरवानीचा मुलगा मिहीर हिरवानी इंडिया रेडकडून दुलीप ट्रॉफीमध्ये पदार्पण करेल.
याचबरोबर बीसीसीआयनं दक्षिण आफ्रिकेच्या ए टीमविरुद्ध होणाऱ्या चार दिवसांच्या दोन मॅचसाठी भारतीय ए टीमचीही घोषणा केली आहे. श्रेयस अय्यर या टीमचा कर्णधार असेल.
फैज फैजल (कर्णधार), अभिषेक रमण, अनमोलप्रित सिंग, गणेश सतीश, एन. गांगता, ध्रुव शौरी, के.एस. भारत (विकेट कीपर), अक्षय वाघरे, सौरव कुमार, स्वप्निल सिंग, बसील थंपी, बी. अय्यप्पा, जयदेव उनाडकट, धवल कुलकर्णी
अभिनव मुकुंद (कर्णधार), आर.आर. संजय, आशुतोष सिंग, बाबा अपराजित, ऋतिकि चटर्जी, बी. संदीप, अभिषेक गुप्ता (विकेट कीपर), शाहबाज नदीम, मिहीर हिरवानी, परवेज रसूल, रजनीश गुरबानी, अभिनव मिथुन, ईशान पोरेल, पृथ्वी राज
पार्थिव पटेल (कर्णधार/ विकेट कीपर), प्रशांत चोप्रा, प्रियंक पांचाळ, सुदीप चटर्जी, गुरकीरत मान, वी.पी. सोलंकी, जलज सक्सेना, कर्ण शर्मा, विकास मिश्रा, अंकित राजपूत, अशोक डिंडा, अतिथ सेठ
श्रेयस अय्यर (कर्णधार), पृथ्वी शॉ, रवीकुमार समर्थ, मयंक अग्रवाल, अभिमन्यू इश्वरन, हनुमा विहारी, अंकित बावने, के. एस. भारत (विकेट कीपर), अक्षर पटेल, शाहबाज नदीम, युझवेंद्र चहल, जयंत यादव, रजनीश गुरबानी, नवदीप सैनी, अंकित राजपूत, मोहम्मद सिराज