सचिनला जीवनगौरव तर अश्विनचाही विशेष सन्मान! BCCI Awards 2023-24 च्या विजेत्यांची संपूर्ण यादी

BCCI Awards 2023-24: शनिवारी मुंबईत बीसीसीआय आयोजित एका कार्यक्रमात देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.   

तेजश्री गायकवाड | Updated: Feb 2, 2025, 10:23 AM IST
सचिनला जीवनगौरव तर अश्विनचाही विशेष सन्मान! BCCI Awards 2023-24 च्या विजेत्यांची संपूर्ण यादी title=
Photo Credit: BCCI/X

BCCI Awards 2025 Full Winners List: भारतीय क्रिकेट नियामक (BCCI Awards 2023-24) मंडळाने 1 फेब्रुवारी रोजी मुंबईत आयोजित कार्यक्रमात 2023-24 हंगामात देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा गौरव करण्यात आला. या पुरस्कार सोहळ्यात महान भारतीय फलंदाज सचिन तेंडुलकरला बीसीसीआयच्या वार्षिक 'नमन पुरस्कार'मध्ये (BCCI Naman Awards 2025) कर्नल सीके नायडू जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. याशिवाय जसप्रीत बुमराह-स्मृती मानधना या दोघांना सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटू आणि माजी दिग्गज फिरकीपटू रविचंद्रन अश्विन यालाही विशेष सन्मान देण्यात आला. चला यंदाच्या पुरस्कार विजेत्यांची संपूर्ण यादी पाहूयात...

पुरस्कार विजेत्यांची संपूर्ण यादी

  • कर्नल सी.के. नायडू जीवनगौरव पुरस्कार - (पुरुष): सचिन तेंडुलकर
  • पॉली उमरीगर पुरस्कार – सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू (पुरुष): जसप्रीत बुमराह
  • सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू (महिला): स्मृती मानधना
  • सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय पदार्पण – (पुरुष): सरफराज खान
  • सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय पदार्पण – (महिला): आशा शोभना
  • बीसीसीआय विशेष पुरस्कार: रविचंद्रन अश्विन

 हे ही वाचा: W/L बोर्ड पाहून ट्रेन चालक शिट्टी का वाजवतो? जाणून घ्या कारण

 

  • एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारी महिला खेळाडू: स्मृती मानधना
  • एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणारी महिला खेळाडू: दीप्ती शर्मा
  • देशांतर्गत क्रिकेटमधील सर्वोत्कृष्ट पंच : अक्षय तोत्रे
  • M.A. चिदंबरम करंडक – अंडर-19 कूचबिहार ट्रॉफीमध्ये सर्वाधिक धावा: काव्या तेतिया
  • M.A. चिदंबरम ट्रॉफी - अंडर-19 कूचबिहार ट्रॉफीमध्ये सर्वाधिक बळी: विष्णू भारद्वाज

 हे ही वाचा: वडिलांनी हाकलून दिले, एका वर्षात घटस्फोट, संपूर्ण कारकिर्दीत फक्त 2 हिट्स सिनेमे; तरीही अभिनेत्रीचं नेटवर्थ 170 करोड

 

  • जगमोहन दालमिया ट्रॉफी - ज्येष्ठ महिला देशांतर्गत क्रिकेटपटू: प्रिया मिश्रा
  • जगमोहन दालमिया ट्रॉफी - ज्युनियर महिला डोमेस्टिक क्रिकेटर: ईश्वरी अवसरे
  • जगमोहन दालमिया ट्रॉफी - अंडर-16 विजय मर्चंट ट्रॉफीमध्ये सर्वाधिक विकेट्स: हेमचुदेसन जनेगनाथन
  • जगमोहन दालमिया ट्रॉफी - अंडर-16 विजय मर्चंट ट्रॉफीमध्ये सर्वाधिक धावा: लक्ष्य रैचंदानी
  • M.A. चिदंबरम ट्रॉफी - 23 वर्षांखालील सीके नायडू ट्रॉफीमध्ये सर्वाधिक विकेट्स (प्लेट गट): नीझेखो रुपरेओ
  • M.A. चिदंबरम ट्रॉफी - 23 वर्षांखालील सीके नायडू ट्रॉफीमध्ये सर्वाधिक धावा (प्लेट गट): हेम छेत्री
  • M.A. चिदंबरम ट्रॉफी - 23 वर्षांखालील सीके नायडू ट्रॉफीमध्ये सर्वाधिक विकेट्स (एलिट गट): पी विद्युत
  • M.A. चिदंबरम ट्रॉफी - 23 वर्षांखालील सीके नायडू ट्रॉफीमध्ये सर्वाधिक धावा (एलिट गट): अनिश के.व्ही.

 हे ही वाचा: टीम इंडियावर 'बेईमानीचा' आरोप! जाहीर पत्रकार परिषदेत इंग्लंडचा कर्णधार संतापला, झाला मोठा वाद

 

  • माधवराव सिंधिया पुरस्कार – रणजी ट्रॉफीमध्ये सर्वाधिक विकेट्स (प्लेट गट): तनय थियागराजन
  • माधवराव सिंधिया पुरस्कार – रणजी ट्रॉफीमध्ये सर्वाधिक विकेट्स (एलिट गट): आर साई किशोर
  • माधवराव सिंधिया पुरस्कार – रणजी ट्रॉफीमध्ये सर्वाधिक धावा (प्लेट गट): अग्नि चोप्रा
  • माधवराव सिंधिया पुरस्कार – रणजी ट्रॉफीमध्ये सर्वाधिक धावा (एलिट गट): रिकी भुई
  • लाला अमरनाथ पुरस्कार – देशांतर्गत मर्यादित षटकांच्या स्पर्धांमध्ये सर्वोत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू: शशांक सिंग
  • लाला अमरनाथ पुरस्कार - रणजी करंडकातील सर्वोत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू: तनुष कोटियन
  • बीसीसीआयच्या देशांतर्गत स्पर्धांमध्ये सर्वोत्तम कामगिरी करणारा संघ: मुंबई

 

 हे ही वाचा: मोठ्या उद्योगपतीच्या लेकीवर जडला टीम इंडियाच्या प्रशिक्षकाचा जीव, लव्हस्टोरी आहे एकदम फिल्मी

या पुरस्कार सोहळ्यात, विजेत्यांना ट्रॉफी तसेच रोख बक्षिसे, 50,000 ते 15 लाखांपर्यंत देण्यात आली. हा पुरस्कार केवळ  खेळाडूंचाच सन्मान करत नाही तर तरुण आणि उदयोन्मुख क्रिकेटपटूंना एक मोठा व्यासपीठही देतो. याशिवाय बीसीसीआय नमन पुरस्कारांमध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल पंच आणि इतर अधिकाऱ्यांनाही गौरविण्यात आले. या भव्य कार्यक्रमाने भारतीय क्रिकेटच्या दिग्गजांना एका व्यासपीठावर एकत्र आणले आणि खेळाप्रती त्यांच्या मेहनतीला आणि समर्पणाला सलाम केला.