Video : महाकुंभात पोहोचला RCB चा जबरा फॅन, जर्सी सोबत गंगेत मारली डुबकी

Mahakumbh 2025: सध्या प्रयागराज येथे महाकुंभाचे आयोजन करण्यात आले असून येथे आरसीबीचा एक चाहता संघाची जर्सी घेऊन आला होता आणि त्याने जर्सीला देखील गंगेमध्ये आंघोळ घातली. 

पुजा पवार | Updated: Jan 21, 2025, 03:29 PM IST
Video : महाकुंभात पोहोचला RCB चा जबरा फॅन, जर्सी सोबत गंगेत मारली डुबकी  title=
(Photo Credit : Social Media)

Mahakumbh 2025: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (Royal Challengers Bengaluru) हा संघ आयपीएलच्या इतिहासातील सर्वात लोकप्रिय संघांपैकी एक असून त्यांची फॅन फॉलोईंग खूप मोठी आहे. आरसीबीची टीम ही आयपीएलच्या सुरुवातीपासूनच या स्पर्धेचा भाग आहे. तीन वेळा हा संघ आयपीएलच्या फायनलपर्यंत पोहोचला, परंतु त्यांना एकदाही आयपीएलचे विजेतेपद पटकावता आलेले नाही. असं असलं तरी दरवर्षी आयपीएलपूर्वी आरसीबीचे चाहते यंदातरी त्यांचा संघ जिंकावा यासाठी प्रार्थना करताना दिसतात. सध्या प्रयागराज येथे महाकुंभाचे आयोजन करण्यात आले असून येथे आरसीबीचा एक चाहता संघाची जर्सी घेऊन आला होता आणि त्याने जर्सीला देखील गंगेमध्ये आंघोळ घातली. 

व्हायरल होतोय व्हिडीओ : 

अनेक श्रद्धाळू प्रयागराज येथे सुरु असलेल्या महाकुंभामध्ये सहभागी होतात. येथे येणारे श्रद्धाळू त्रिवेणी संगमावर जाऊन डुबकी मारतात. या श्रद्धाळुंमध्ये आरसीबीचा जबरा फॅन सुद्धा सहभागी झाला. या चाहत्याने साधूंसोबत त्रिवेणी संगमावर डुबकी मारली आणि हातात आरसीबीची जर्सी घेऊन त्याला देखील आंघोळ घातली. आरसीबीच्या चाहत्याचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतं आहे. व्हिडीओमध्ये आरसीबीच्या चाहत्याने संघाच्या जर्सीसोबत तीन वेळा डुबकी मारली. तसेच शेवटी तो 'ई साला कप नामदे' असं म्हणताना दिसतो. 

हेही वाचा : चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी BCCI चा पाकिस्तानला झटका, जर्सी संदर्भातील 'हा' निर्णय PCB ला झोंबला

पाहा व्हिडीओ : 

आयपीएल 2024 मध्ये प्लेऑफमध्ये पोहोचली होती आरसीबी : 

आयपीएल 2024 मध्ये आरसीबीच्या संघाने निर्णायक सामन्यात चेन्नई सुपरकिंग्सचा पराभव करून प्लेऑफमध्ये स्थान मिळवलं होतं. ज्यामुळे त्यांना एलिमिनेटर सामना खेळावा लागला. राजस्थान रॉयल्स सोबत झालेल्या एलिमिनेटर सामन्यात आरसीबीचा ४ विकेट्सने पराभव झाला होता. त्यामुळे पुन्हा एकदा आरसीबीचं आयपीएल ट्रॉफी विजयाचं स्वप्न भंगलं होतं.  महिला प्रीमिअर लीगमध्ये आरसीबीच्या महिला क्रिकेट संघाने कर्णधार स्मृती मंधानाच्या नेतृत्वात महिला प्रीमियर लीगची ट्रॉफी उंचावली होती. 

आयपीएल 2025 मेगा ऑक्शनमध्ये आरसीबीने कोणाला खरेदी केलं? 

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने आयपीएल ऑक्शनपूर्वी विराट कोहली सह तीन खेळाडूंना रिटेन केलं होतं. यात विराट कोहली (21 कोटी), यश दयालरजत पाटीदार (11 कोटी) आणि यश दयाल (5 कोटी) यांचा समावेश होता. आरसीबीने यंदा 12 कॅप्ड खेळाडूंना ऑक्शनमधून खरेदी केले आहे. यात जोश हेजलवुड 12.50 कोटी, फिल सॉल्ट 11.50  कोटी, जितेश शर्मा 11 कोटी, भुवनेश्वर कुमार 10.75  कोटी, लियाम लिविंगस्टोन 8.75 कोटी, कृणाल पंड्या 5.75 कोटी, टीम डेव्हिड 3 कोटी, जैकब बेटेल 2.60  कोटी, देवदत्त पड्डीकल 2 कोटी, नुवान तुषार 1.60 कोटी, रोमारियो शेफर्ड 1.50  कोटी, लुंगिसानी एनगिडी 1 कोटी यांचा समावेश आहे. तर आरसीबीने आयपीएल 2025 ऑक्शनमध्ये 7 खेळाडूंना अनकॅप्ड खेळाडूंना खरेदी केलं. यात रसिख डार 6 कोटी, सुयश शर्मा 2.60 कोटी, स्वप्निल सिंह 50 लाख, तर मोहित राठी, अभिनंदन सिंह, स्वस्तिक छिकारा, मनोज भंडागे यांना प्रत्येकी 30 कोटींना विकेट घेतलं.