आज मुंबईत रंगणार Ind vs Eng 5th T20 सामना, अर्शदीप की हार्दिक? आज कोणाला मिळणार विश्रांती

IND vs ENG: आजची मॅच जिंकून विजयी चौकार मारण्याचा इरादा टीम इंडियाचा असेल. टीम इंडियाच्या बॅटर्सना रोखण्याचं मोठं आव्हान इंग्लंडसमोर असणार आहे. 

तेजश्री गायकवाड | Updated: Feb 2, 2025, 01:59 PM IST
आज मुंबईत रंगणार Ind vs Eng  5th T20 सामना, अर्शदीप की हार्दिक? आज कोणाला मिळणार विश्रांती title=

Ind vs Eng 5th T20 Playing 11: टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्यात आज पाचवी आणि शेवटची टी-20 मॅच रंगणार आहे. संध्याकाळी 7.30 वाजता मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर भारत आणि इंग्लंड यांच्यात मुकाबला रंगणार आहे. टीम इंडियानं यापूर्वीच 3 टी-20 जिंकून सीरिजमध्ये विजयी आघाडी घेतली आहे. इंग्लंडला आतापर्यंत सीरिजमध्ये केवळ एकच मॅच जिंकता आली आहे. सूर्यकुमार यादवच्या कॅप्टन्सीखाली टीम इंडियाच्या यंग ब्रिगेडनं चमकदार कामगिरी केली आहे. आजची मॅच जिंकून विजयी चौकार मारण्याचा इरादा टीम इंडियाचा असेल. टीम इंडियाच्या बॅटर्सना रोखण्याचं मोठं आव्हान इंग्लंडसमोर असणार आहे. 

ठराविक खेळाडूंचाच टीम इंडियाच्या विजयात वाटा 

टीम इंडियातील खेळाडूंच्या कामगिरीवर नजर टाकली तर ठराविक खेळाडूच टीम इंडियाच्या विजयात वाटा उचलत आहेत.  सलामीवीर संजू सॅमसनचा हरवलेला फॉर्म टीम इंडियासाठी चिंताजनक आहे. कर्णधार सूर्यकुमार यादव पहिल्या चार मॅचमध्ये सपशेल फ्लॉप ठरला आहे. टीमचा कॅप्टन म्हणून मोठी खेळी करण्यात सूर्याला अपयश आलं आहे. टीम इंडियाच्या बॉलिंगवर नजर टाकली तर वरुण चक्रवर्तीच्या फिरकीसमोर इंग्लंडचे बॅटर चाचपडताना दिसले. हार्दिक पांड्या, अर्शदीप सिंग, अक्सर पटेल मोक्याच्या क्षणी विकेट्स घेत इंग्लंडला सतावत आहेत.  

हे ही वाचा: कॉमेंटेटर क्रिकेटपटूंपेक्षा कमी नाही! कमाई ऐकून व्हाल थक्क, जगतात लॅव्हिश लाइफस्टाईल

इंग्लंडच्या संघाला फॉर्मच सापडेना  

दुसरीकडे इंग्लंडची टीम संपूर्ण सीरिजमध्ये चाचपडताना दिसली आहे. इंग्लंडच्या खेळाडूंना पाहिजे तसा सीरिजमध्ये फॉर्मच सापडलेला नाही. राजकोट टी-20 वगळता इंग्लंडला सीरिजमध्ये म्हणावी तशी कामगिरी करण्यात सपशेल अपयश आलं आहे. इंग्लंडचा कॅप्टन जॉस बटलर हा एकटाच टीम इंडियाच्या खेळाडूंचा नेटानं मुकाबला करत आहे. इतर महत्त्वाचे बॅट्समननी टीम इंडियाच्या बॉलर्ससमोर लोटांगण घातलं आहे.  इंग्लंडचे बॉलर्स पण सीरिजमध्ये छाप पाडण्यात अपयशी ठरले आहेत. एकूणच काय जर टीम इंडिया आणि इंग्लंडच्या खेळाडूंच्या कामगिरीवर नजर टाकली तर टीम इंडियाचं पारडं इंग्लंडसमोर तगडं दिसतं आहे. त्यामुळे आजची मॅच जिंकून वन-डे मॅच सीरिजपूर्वी इंग्लंडचं खच्चीकरण करण्याचा टीम इंडियाचा इरादा असेल.

हे ही वाचा: सचिनला जीवनगौरव तर अश्विनचाही विशेष सन्मान! BCCI Awards 2023-24 च्या विजेत्यांची संपूर्ण यादी

 

टीम इंडियाची संभाव्य प्लेइंग 11

अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव (कर्णधार),  तिलक वर्मा,  हार्दिक पंड्या,  रिंकू सिंग,  अक्षर पटेल,  रमणदीप सिंग/हर्षित राणा,  अर्शदीप सिंग/मोहम्मद शमी,  रवी बिश्नोई,  वरुण चक्रवर्ती

 हे ही वाचा: टीम इंडियावर 'बेईमानीचा' आरोप! जाहीर पत्रकार परिषदेत इंग्लंडचा कर्णधार संतापला, झाला मोठा वाद

 

इंग्लंडची संभाव्य प्लेइंग 11

फिल सॉल्ट (यष्टीरक्षक),  बेन डकेट, 3 जोस बटलर (कर्णधार),  हॅरी ब्रूक,  लियाम लिव्हिंगस्टोन,  जेमी स्मिथ/जेकब बेथेल,  जेमी ओव्हरटन,  ब्रायडन कार्स,  जोफ्रा आर्चर/गस ऍटकिन्सन,  साकिब महमूद, आदिल रशीद/रेहान अहमद