IND vs PAK : चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी भारताच्या 'या' क्रिकेट टीमला मिळाली पाकिस्तानला जाण्याची परवानगी

Indian Cricket Team : तीन स्पर्धा 2012, 2017 आणि 2022 मध्ये झाल्या. 2022 मध्ये बंगळुरू येथे झालेलया फायनल सामन्यात भारताने बांगलादेशचा 120 धावांनी पराभव केला होता.

पुजा पवार | Updated: Nov 12, 2024, 03:20 PM IST
IND vs PAK : चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी भारताच्या 'या' क्रिकेट टीमला मिळाली पाकिस्तानला जाण्याची परवानगी  title=
(Photo Credit : Social Media)

Indian Cricket Team : पाकिस्तानमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 (Champions Trophy) चे आयोजन केले जाणार आहे. मात्र भारत सरकारने बीसीसीआयला (BCCI) भारतीय क्रिकेट संघ चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी पाकिस्तानला पाठवण्यास परवानगी दिलेली नाही. दोन्ही देशांमधील बिघडलेले राजकीय संबंध आणि सुरक्षेच्या कारणामुळे भारत सरकारने ही परवानगी देण्यात नकार दिलाय. मात्र याच दरम्यान एक दुसरी मोठी बातमी समोर येत असून भारतीय ब्लाइंड क्रिकेट टीमला पाकिस्तानात होणाऱ्या टी 20 वर्ल्ड कपमध्ये सहभागी होण्याची परवानगी देण्यात आलेली आहे. 

2024 च्या ब्लाइंड टी 20 वर्ल्ड कप 2024 चं आयोजन यंदा पाकिस्तानात केलं जाणार आहे. ही स्पर्धा 23 नोव्हेंबर ते 30 डिसेंबर पर्यंत खेळली जाणार असून यासाठी भारतीय ब्लाइंड क्रिकेट टीमला पाकिस्तानात जाण्याची परवानगी खेळ मंत्रालयाने दिलेली आहे. 

गृह आणि परराष्ट्र मंत्रालयाकडून परवानगीची प्रतीक्षा : 

खेळ मंत्रालयाने भारतीय ब्लाइंड क्रिकेट टीमला पाकिस्तानात जाण्याची परवानगी दिली असली तरी अदयाप गृह आणि परराष्ट्र मंत्रालयाने याबाबत मंजुरी दिलेली नाही.  भारताची टीम पाकिस्तानात पाठवायची असेल तर त्यासाठी गृह आणि परराष्ट्र मंत्रालयाकडून परवानगी घेण्याची आवश्यकता असते. मात्र स्पर्धा सुरु होण्यासाठी काहीच दिवस शिल्ल्क असतानाही संघ पाकिस्तानला पाठवायचा कि नाही याबाबत अजून स्पष्टता देण्यात आलेली नाही. क्रिकेट असोसिएशन फॉर द ब्लाइंड इन इंडिया (सीएबीआय) चे सहाय्यक सचिव शैलेंद्र यादव यांनी आज तकला सांगितले की ते सुमारे दोन आठवड्यांपासून सरकारच्या मंजुरीची वाट पाहत आहोत. त्यांनी सांगितले की, 'आम्ही मंजुरीची वाट पाहत जवळपास 15 दिवस झाले. आम्हाला सरकारकडून फक्त हो किंवा नाही असे उत्तर हवे आहे. पण तेही अजून मिळालेले नाही'. सीएबीआयचे सहाय्यक सचिव शैलेंद्र यादव यांनी म्हटले की, 'आम्ही 2014 मध्ये द्विपक्षीय मालिकेसाठी पाकिस्तानचा दौरा केला होता. मात्र, 2018 मध्ये सरकारने पाकिस्तान दौऱ्याला मान्यता दिली नाही. यानंतर 2023 मध्ये भारताने या स्पर्धेचे आयोजन केले होते, मात्र तेव्हा पाकिस्तानचा संघ येथे भारतात खेळण्यासाठी आला नव्हता.

सलग तीन स्पर्धांमध्ये भारत ठरला चॅम्पियन : 

आतापर्यंत ब्लाइंड टी 20 वर्ल्ड कपचे तीनदा आयोजन करण्यात आले. या तिनहीवेळा भारतीय संघ चॅम्पियन ठरला. या तीन स्पर्धा 2012, 2017 आणि 2022 मध्ये झाल्या. 2022 मध्ये बंगळुरू येथे झालेलया फायनल सामन्यात भारताने बांगलादेशचा 120 धावांनी पराभव केला होता. यात भारतीय संघाने बांगलादेशला विजयासाठी 277 धावांचे आव्हान दिले होते मात्र बांगलादेशची टीम केवळ 157 धावाच करू शकली.