मुंबई : टीम इंडिया वेस्ट इंडिजनंतर आता झिम्बाब्वेविरुद्ध तीन वनडे सामन्यांची सिरीज खेळणार आहे. या सिरीजमध्ये केएल राहुल युवा टीमचं नेतृत्व करणार आहे. टीमतील बहुतांश खेळाडू तरुण आहेत. अशा परिस्थितीत या दौऱ्यावर टीम इंडियाचा प्लेइंग 11 कसं असणार आहे याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.
पहिल्या सामन्यात शिखर धवन आणि केएल राहुल ओपनिंग करण्याची शक्यता आहे. या दौऱ्यावर राहुल कर्णधार असून शिखर धवन उपकर्णधारपद सांभाळणार आहे. अशा परिस्थितीत या दोघांशिवाय तिसरा फलंदाज सलामीची जबाबदारी घेण्याची शक्यता फार कमी आहे.
झिम्बाब्वेविरुद्ध भारताच्या णिडल ऑर्डरमध्ये काही युवा खेळाडू दिसण्याची शक्यता आहे. शुभमन गिल तिसऱ्या क्रमांकावर उतरताना दिसेल. गिलने अलीकडेच वेस्ट इंडिजविरुद्ध चांगली कामगिरी केली. त्याचबरोबर इशान किशन चौथ्या क्रमांकावर खेळणार आहे. याशिवाय दीपक हुड्डा आणि राहुल त्रिपाठी यांनाही संधी देण्यात येईल.
या टीममध्ये अक्षर पटेल आणि शार्दुल ठाकूर यांची निवड होऊ शकते. अक्षर स्पिनर म्हणून मैदानात उतरेल. दुसरीकडे शार्दुल वेगवान गोलंदाजीसह फलंदाजीची जबाबदारी सांभाळताना दिसणार आहे.
भारताच्या गोलंदाजीत युवा खेळाडू पाहायला मिळणार आहे. प्रसिद्ध कृष्णा आणि मोहम्मद सिराज हे टीमचे दोन वेगवान गोलंदाज असतील. दुसरीकडे, कुलदीप यादवकडे टीमतील मुख्य फिरकी गोलंदाज म्हणून जबाबदारी देण्यात येईल.
केएल राहुल (कर्णधार), शिखर धवन (उपकर्णधार), शुभमन गिल, ईशान किशन (विकेटकीपर), दीपक हुड्डा, राहुल त्रिपाठी, अक्षर पटेल, शार्दुल ठाकुर, प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव.