R Ashwin : भारताचा अनुभवी गोलंदाज ऑफ स्पिनर रविचंद्रन अश्विन (R Ashwin) याने बॉर्डर गावसकर ट्रॉफीच्या दुसऱ्या सामन्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय घेतला. अचानक निवृत्ती जाहीर केल्याने त्याच्या चाहत्यांना धक्का बसला. अश्विन जगातील क्रिकेटमधील महान गोलंदाजांपैकी एक असून त्याने आपल्या उत्कृष्ट स्पिन गोलंदाजीने भल्याभल्या फलंदाजांना आऊट करून इतिहास रचला आहे. समोर कोण फलंदाज आहे त्याच्या हिशोबाने आपल्या गोलंदाजीत अश्विन वेरिएशन करायचा. बऱ्याचदा एखाद्या फलंदाजांची बॅटिंग टेक्निक समजून घेण्यासाठी अश्विन तासंतास त्यावर रिसर्च करायचा. मात्र या दरम्यान अश्विनची पत्नी प्रीतिला (Prithi Narayan) शंका यायची की तिच्या पतीचं एका खेळाडूवर क्रश तर नाही. हा किस्सा स्वतः अश्विनने एका मुलाखतीत सांगितला आहे.
आर अश्विनने एका मुलाखतीत त्याच्या पत्नीविषयी एक किस्सा सांगितला. यात तो म्हणाला एकदा ऑस्ट्रेलियाचा स्टार क्रिकेटर स्टीव्ह स्मिथची बॅटिंग टेक्निक समजून घेण्यात तो इतका गुंग झाला की त्याची पत्नी प्रीती नारायण हिला अश्विन विषयी शंका येऊ लागली. मजेदार किस्सा सांगताना अश्विन म्हणाला की पत्नी प्रीतीला वाटले की स्टीव्ह स्मिथवर माझा क्रश आले. अश्विनने बंगळुरूच्या AWS AI कॉन्क्लेवमध्ये म्हटले, 'मी स्टीव्ह स्मिथला ऑस्ट्रेलियामध्ये आउट केले. त्यापूर्वी मी स्टीव्ह स्मिथला फलंदाजी करताना पाहिले नव्हते. मी एकदा त्याची बॅटिंग स्टाईलचे निरीक्षण करण्यासाठी रूममध्ये बसलो होतो. तेव्हा माझी पत्नी आणि मुली देखील रूममध्ये होत्या. मी स्टीव्ह स्मिथची बॅटिंग स्टाईलचा अभ्यास करण्यात इतका गुंग झालो होतो कि माझ्या आजूबाजूला कोण आहे याचे भान मला नव्हते. मी त्याच्या हालचालींमधील लहानसहान गोष्टी झूम करून पाहत होतो. त्यावेळी माझी पत्नी मला म्हणाली, 'तू काय पाहतोयस. तू स्टीव्ह स्मिथच्या इतक्या जवळ का जातोयस?
अश्विन पुढे गंमतीत म्हणाला, 'मला वाटते की ती काळजीत होती आणि ते योग्यच आहे. जर तिला वाटले की मला एक माणूस आवडतो, तर मी तिला दोष देणार नाही. कारण मी खूप बारकाईने सर्व पाहत होतो. मी स्टीव्ह स्मिथच्या हातावर खरच झूम करत होतो. यात मला मदत करण्यासाठी अधिक लोकांची किंवा अधिक डेटाची आवश्यकता होती परंतु माझ्याकडे तेव्हा ते नव्हते'.
हेही वाचा : Video : विराट निघाला फुसका बार! युवा गोलंदाजाच्या बॉलिंगवर झाला क्लीन बोल्ड, स्टंप हवेत उडाले
आर अश्विनने 2010 मध्ये श्रीलंके विरुद्ध वनडे सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्याचं एकूण क्रिकेट करिअर हे 14 वर्षांचं होतं. अश्विनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून जरी निवृत्ती घेतली असली तरी तो आयपीएल आणि देशांतर्गत सामन्यांमध्ये खेळताना दिसणार आहे. अनिल कुंबळे यांच्यानंतर सर्वाधिक टेस्ट विकेट्स घेणारा आर अश्विन हा दुसरा भारतीय गोलंदाज आहे. रविचंद्रन अश्विन या भारताच्या स्टार स्पिनरने क्रिकेटच्या तीनही फॉरमॅटमध्ये एकूण 765 विकेट्स घेतले आहेत. आर अश्विनने 106 टेस्टमध्ये 537 विकेट्स आणि 3503 धावा केल्या आहेत. तर वनडेमध्ये त्याने 116 सामन्यात 156 विकेट्स आणि 707 धावा केल्या आहेत. टी 20 मध्ये अश्विनने 65 सामन्यात 72 आणि 31 धावा केल्या आहेत.